जगतापांची भाईिगरी संपविण्यासाठी स्वबळावर लढणार जगन सोनवणे : उद्या पुतळा दहन व काँग्रेस भवनासमोर ठिय्या आंदोलन
By admin | Published: March 6, 2016 10:06 PM2016-03-06T22:06:45+5:302016-03-06T22:06:45+5:30
सेंट्रल डेस्कसाठी
जळगाव : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना झोपडपीधारकांच्या व्यथा मांडण्यासाठी व निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो. मात्र काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी अपमान करीत बाहेर काढले. भाई जगताप यांची भाईिगरी संपविण्यासाठी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुक पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे स्वबळावर लढविण्यात येतील असा इशारा प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.
जिल्हा पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेला गौतम निकम, मुकेश जाधव, अनिल बडगे, राजेश इंगळे, अनिल सुरवाडे, गजानन कांबळे, संगीता ब्रााणे उपस्थित होते.
जिल्हाध्यक्षांच्या निमंत्रणावरून कार्यक्रमाला गेलो
पिंप्राळा येथील झोपडपीधारकांवर होत असलेला अन्याय व त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही माजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. त्या संदर्भात जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील व जिल्हा सरचिटणीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी फोन केल्यानंतर आम्ही कार्यक्रमस्थळी गेल्याचे त्यांनी सांगितले.
गद्दारी झाली तेव्हा भाई जगताप कोठे होते?
विधानसभा निवडणुकीत भुसावळ मतदार संघातून पत्नीने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यावेळी स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी अन्य पक्षासोबत हातमिळविणी केली होती. काँग्रेसच्या त्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी आपण केली होती. त्यावेळी भाई जगताप कोठे गेले होते असा सवाल त्यांनी केला.
जगतापांची भाईिगरी मोडणार
आमदार भाई जगताप यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर केलेला अपमान हा आमच्या जिव्हारी लागला आहे. काँगे्रस आमचा मित्र पक्ष असला तरी आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही. भाई जगताप यांची भाईिगरी मोडण्यासाठी आगामी काळातील विधानसभा व लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवून त्यांना त्यांची जागा दाखविण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
पुतळा दहन आणि ठिय्या आंदोलन
८ मार्च रोजी भाई जगताप यांचा पुतळा दहन करण्यात येणार आहे. तसेच दुपारी दोन वाजता पी.आर.पी.तर्फे जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेस पदाधिकारी माफी मागत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.