चंद्राबाबू नायडूंना जगनमोहन रेड्डींचा आणखी एक धक्का; 'तो' निर्णयच रद्द केला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 02:41 PM2019-06-03T14:41:09+5:302019-06-03T14:42:09+5:30
वायएसआर काँग्रेसचे नेते विजय साई रेड्डी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
हैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या चंद्राबाबू नायडूंना नवनियुक्त मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आणखी एक धक्का दिला आहे. केंद्रीय संस्था सीबीआयला आंध्र प्रदेशमध्ये छापे टाकण्यावरील बंदी हटविली आहे.
वायएसआर काँग्रेसचे नेते विजय साई रेड्डी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रेड्डी यांच्या निर्णयामुळे राज्यतील कोणीही अपराधी वाचू शकणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सीबीआय, ईडी सारख्या केंद्रीय तपास संस्थांवर राज्यात धाडी टाकण्यास बंदी घातली होती. केंद्रातील मोदी सरकार या संस्थांचा वापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या संस्थांना एका करारानुसार राज्यांची परवानगी न घेता धाडी टाकण्याची परवानगी देण्यात आली होती. हा करारच तत्कालीन नायडू सरकारने मागे घेतला होता. यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनीही नायडू यांच्या पावलावर पाऊल ठेवले होते.
Vijayasai Reddy,YSRCP: Chandrababu banned CBI, he prevented IT raids, he questioned how ED comes in the state. Now Jagan has issued orders allowing the CBI into the state. CM made it clear that thieves will not be spared. Look out Chandrababu. #AndhraPradesh (file pic) pic.twitter.com/LOQkbpRMwb
— ANI (@ANI) June 3, 2019
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये 175 पैकी 151 जागा जिंकल्या होत्या.