जगनमोहन रेड्डी यांना न्यायालयात हजर होण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 06:12 AM2020-01-05T06:12:02+5:302020-01-05T06:12:17+5:30
ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना १० जानेवारी रोजी न्यायालयासमोर हजर होण्याचे निर्देश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत.
हैदराबाद : ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना १० जानेवारी रोजी न्यायालयासमोर हजर होण्याचे निर्देश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत.
आपल्याला हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका रेड्डी यांनी दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले. रेड्डी हे मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे सुनावणीला हजर राहिलेले नाहीत. न्यायालय दर शुक्रवारी सुनावणी करत आहे. रेड्डी यांना मे २०१२ मध्ये अटक केल्यानंतर सप्टेंबर २०१३ मध्ये चंचलगुडा तुरुंगातून जामीनावर सोडण्यात आले होते. सीबीआय न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला होता.