गुरुग्राममधील जगन्नाथ मंदिराची भिंत कोसळली; एका कामगाराचा मृत्यू, ४ जणांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 06:18 PM2023-12-25T18:18:24+5:302023-12-25T18:21:39+5:30
दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये सोमवारी मोठी दुर्घटना घडली.
नवी दिल्ली: दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये सोमवारी मोठी दुर्घटना घडली. सेक्टर १५ मधील भाग २मध्ये बांधकाम सुरु असलेल्या जगन्नाथ मंदिराची भिंत कोसळली. यावेळी ढिगाऱ्याखाली पाच जण जागीच गाडले गेले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम राबवली, त्यानंतर सर्वांना बाहेर काढण्यात आले.
सर्व कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सिव्हिल लाइनवर असलेल्या जगन्नाथ मंदिरात तळघर बांधण्याचे काम सुरू होते, त्यात अनेक मजूर काम करत होते. तळघरातील माती उद्ध्वस्त झाल्याने जवळील भिंत खालून तुटून कामगारांवर पडली. त्यात चंद्रपाल (२६) या मजुराचा मृत्यू झाला. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ नागरी संरक्षण दल कार्यरत आहेत.
#WATCH | Five workers are feared trapped after the wall of a temple collapsed in Gurugram, Haryana. Rescue operation is underway.
— ANI (@ANI) December 25, 2023
More details are awaited. pic.twitter.com/1kLoZrTN8f