दम असेल तर...; जगतगुरु रामभद्राचार्य यांचं बिहारच्या शिक्षणमंत्र्यांना थेट आव्हान, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 12:35 PM2023-11-03T12:35:57+5:302023-11-03T12:36:49+5:30
"जर त्यांना त्यांच्या आईने प्रामाणिकपणाचे दूध पाजले असेल तर..."
बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानससंदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून, आता जगतगुरु श्री रामभद्राचार्य यांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. "चंद्रशेखर यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी येथे येऊन रामचरितमानसच्या सर्व संगतींवर चर्चा करावी. जर त्यात काही विसंगती आढळली, तर मी पाटण्याच्या गंगे समाधी घेईन अन्यथा त्यांना राजकारणातून सन्यास घ्यायला हवा," असे श्री रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे. बिहारचे शिक्षणमंत्री प्रो. चंद्रशेखर यांनी रामचरितमानसमध्ये पोटॅशियम सायनाइड असल्याचा दावा केला होता.
बगहा येथील रामनगरात तिसऱ्या दिवशीच्या कथे दरम्यान चंद्रशेखर यांना आव्हान देत रामभद्राचार्य म्हणाले, चंद्रशेखर यांचे म्हणणे आहे की, रामचरीत मानसमध्ये विसंगती आहे. जर त्यांना त्यांच्या आईने प्रामाणिकपणाचे दूध पाजले असेल तर, त्यांनी रामचरितमानसवर चर्चा करावी. जर मी हारलो, तर पाटण्याच्या गंगेत त्रिदंड फेंकून देईन. पण जर ते हारले, तर त्यांना राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल.
2024 मध्ये देशात अन् 2025 मध्ये बिहारमध्येही कमळच फुलणार -
या कथेदरम्यान रामभद्राचार्य यांनी बिहारमधील जात जनगणनेवरूनही नितीश सरकारवर निशाणा साधला. ते म्हमाले, रामचरितमानसमध्ये जातीवादाचा उल्लेख असल्याचे बिहार सरकारचे मंत्री सांगत आहेत. मात्र दुसरीकडे, त्यांचेच सरकार जात जनगणना करून बिहारचे विभाजन करण्याचे काम करत आहे.
नितीश कुमार यांनी जात जनगणना करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. देशात 2024 मध्ये मोदी सरकारच स्थापन होईल आणि 2025 मध्ये बिहारमध्येही कमळच फुलेल, असे म्हणत त्यांनी आर्थिक निकशावर आरक्षणाचेही समर्थन केले.