जगमोहन दालमियांना हृदयविकाराचा तीव्र झटका
By Admin | Published: September 18, 2015 04:04 AM2015-09-18T04:04:45+5:302015-09-18T05:31:11+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना काल रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने येथील बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १८ - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना काल रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने येथील बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जगमोहन दालमियांची प्रकृती नाजूक होती. मात्र काल रात्री त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना नऊच्या सुमारास बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, ही माहिती मिऴताच, भारताचा माजी कप्तान सौरभ गांगुली, पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री अरुप बिस्वास यांच्यासह बंगाल क्रिकेट बोर्डाच्या काही पदाधिका-यांनी बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये येऊन जगमोहन दालमियांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये जगमोहन दालमियांच्यासोबत त्यांचे पुत्र अभिषेक उपस्थित आहेत.