जगमोहन यांचा गुरुवारी होणार शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 04:00 AM2019-05-26T04:00:42+5:302019-05-26T04:01:53+5:30

वाय. एस. जगमोहन रेड्डी यांची शनिवारी एकमताने निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी राज्यपाल ई.एस.एल. नरसिम्हा यांनी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले.

Jagmohan will be sworn in Thursday | जगमोहन यांचा गुरुवारी होणार शपथविधी

जगमोहन यांचा गुरुवारी होणार शपथविधी

Next

विजयवाडा (आंध्र प्रदेश) : वायएसआर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी वाय. एस. जगमोहन रेड्डी यांची शनिवारी एकमताने निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी राज्यपाल ई.एस.एल. नरसिम्हा यांनी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. गुरूवारी दुपारी १२:२३ मिनिटांनी जगनमोहन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
विजयवाडाहून ते विमानाने शनिवारी हैदराबादला पोहोचल्यानंतर दुपारी ४.३० वाजता त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर ते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचीही भेट घेणार आहेत, असे वायएसआरसीच्या सूत्रांनी सांगितले.
तत्पूर्वी, विजयवाडा येथे पक्ष कार्यालयात पार पडलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत त्यांची युवाजन श्रमिका रायतू काँग्रेस (वायएसआरसी) विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केल्याबद्दल जगमोहन रेड्डी यांनी सर्व आमदारांचे आभार मानले.
३० मे रोजी इंदिरा गांधी म्युन्सिपल स्टेडियमवर शपथविधी होईल, असे याआधीच पक्षाने घोषित केले होते. १७५ सदस्य असलेल्या आंध्र प्रदेश विधानसभेत वायएसआर काँग्रेसला १५१ जागा मिळाल्या आहेत.

Web Title: Jagmohan will be sworn in Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.