जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 09:26 PM2017-11-06T21:26:53+5:302017-11-06T22:50:46+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, तर एक जवान शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, तर एक जवान शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील अलगर कंडी येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलादरम्यान झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. या चकमकीत एक नागरिकही गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून या दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा जवानांनी जप्त केला आहे.
#UPDATE J&K: Three terrorists killed during encounter with security forces in Pulwama district's Aglar Kandi. Encounter underway. pic.twitter.com/NyTllRAsIR
— ANI (@ANI) November 6, 2017
दरम्यान, असे समजते की हिजबुल या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर समीर टायगर याला सुरक्षा रक्षकांनी घेराव घातला आहे. तसेच, येथील गावात तीन दहशतवादी लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरुच असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
#UPDATE J&K: One security personnel lost his life& one civilian injured in encounter with terrorists in Pulwama's Aglar Kandi. Encounter on. pic.twitter.com/PrQvKZ2e2U
— ANI (@ANI) November 6, 2017
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला होता. या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. पुलवामामधील राजपोरा येथे पोलीस स्थानकाजवळच दहशतवाद्यांनी पथकावर हा हल्ला केला होता. तर दुसरीकडे काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना बारामुला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये ठार करण्यात आले होते. उरी सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले होते.