राष्ट्रीय पुरस्कारांत ‘जय महाराष्ट्र’, 4 बालकांचा मोदींच्याहस्ते ऑनलाईन सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 09:15 AM2022-01-25T09:15:46+5:302022-01-25T09:16:25+5:30
नवसंशाेधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बालकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. पदक, एक लाख रुपये व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
नवी दिल्ली/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते सोमवारी आभासी पद्धतीने महाराष्ट्रातील चार बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधानांनी चौघांच्या शाैर्याची व सुप्त गुणांची प्रशंसा केली. देशातील २१ राज्यांतील ३२ बालकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. क्रीडा, शाैर्य, नवसंशाेधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बालकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. पदक, एक लाख रुपये व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
शिवांगी काळे (जळगाव)
केवळ सहा वर्षांची असलेल्या शिवांगीची वीरता या श्रेणीत निवड झाली. विजेत्यांमध्ये ती सर्वात लहान आहे. समयसूचकता दाखवून हिने आईला विजेचा शॉक लागल्यानंतर आईसह लहान बहिणीचे प्राण वाचवले.
जिया राय (मुंबई)
अवघ्या तेरा वर्षीय जियाला क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला. जिया उत्तम ओपन वॉटर पॅरा
स्वीमर असून तिने ओपन वाॅटर पॅरा स्वीमिंगमध्ये विश्वविक्रम केला.
जुई केसकर (पुणे)
१५ वर्षाच्या जुईला नवसंशाेधनासाठी हा पुरस्कार मिळाला. पार्किन्सन्सच्या रुग्णांसाठी तिने हातमाेजे तयार केले आहेत. त्यामुळे रुग्णांना हालचाली सुकर झाल्या. उपकरणाला जे ट्रेमर थ्रीडी म्हटले जाते. तिने काकांना आठ वर्षे या आजाराशी झुंजताना पाहिले होते.
nस्वयम् पाटील (नाशिक)
१४ वर्षांचा दिव्यांग जलतरणपटू स्वयम् याला क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला आहे. त्याने वयाच्या १० व्या वर्षी पाच किलाेमीटर व १३ व्या वर्षी
१४ किलाेमीटर अंतर पाेहून विश्वविक्रमाची नाेंद केली.