जय शिवाजी़़़जय भवानी़़़ शिवजयंतीचा समारोप : पारंपरिक वाद्य, चित्तथरारक प्रात्यक्षिके, विधायक उपक्रमावर भर
By Admin | Published: February 20, 2016 12:07 AM2016-02-20T00:07:05+5:302016-02-20T00:07:05+5:30
सोलापूर : लहान-मोठी मंडऴे़़ एक ीक डे डॉल्बीचा दणदणाट आणि दुसरीकडे पारंपरिक वाद्यांवर लेझीम, झांज खेळाचे सादरीकरण़़़ काही तरुण मंडळांकडून चित्तथरारक प्रात्यक्षिक़े़़़ अलोट गर्दीतून ‘जय शिवाजी़़़ जय भवानी’चा जयजयकार करीत शिवजयंतीचा मिरवणुकीने समारोप झाला़
स लापूर : लहान-मोठी मंडऴे़़ एक ीक डे डॉल्बीचा दणदणाट आणि दुसरीकडे पारंपरिक वाद्यांवर लेझीम, झांज खेळाचे सादरीकरण़़़ काही तरुण मंडळांकडून चित्तथरारक प्रात्यक्षिक़े़़़ अलोट गर्दीतून ‘जय शिवाजी़़़ जय भवानी’चा जयजयकार करीत शिवजयंतीचा मिरवणुकीने समारोप झाला़ प्रारंभी शिंदे चौकात राष्ट्रविकास बालक मंदिरात मध्यवर्ती मंडळाच्या मूर्तीचे पूजन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करुन मिरवणुकीला शुभारंभ करण्यात आला़ यावेळी माजी आमदार, बाजार समितीचे सभापती दिलीप माने, दास शेळके, नगरसेवक धर्मा भोसले, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे, सुनील रसाळे, मनपा स्थायी समितीचे सभापती पद्माकर काळे, राज जाधव, अर्जुन सुरवसे, र्शीकांत घाडगे, अंबादास गुत्तीक ोंडा, सुरेश फलमारी यांची प्रमुख उपस्थिती होती़ जय शिवाजी़़़जय भवानीचा जयजयकार करीत येथून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला़ रायगडाहून ज्योत आली सोलापुरातमागील वर्षाप्रमाणे यंदाही तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न प्रतिष्ठानच्या तरुणांनी रायगडाहून ज्योत डाळिंबी आड येथे मध्यवर्ती मंडळात आणली़ 13 फेब्रुवारी रोजी अप्पू गवळी, विकास कांबळे आणि राम करंडे यांचा तरुण गट रायगडमध्ये दाखल झाला़ 16 फेब्रुवारी रोजी ही ज्योत घेऊन तरुण तेथून निघाल़े शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता ही ज्योत मध्यवर्ती मंडळात दाखल झाली़ मिरवणुकीनंतर या तरुण गटाने ही ज्योत तामलवाडीकडे घेऊन रवाना झाल़े मिरवणुकीत 30 मंडळांचा सहभाग यंदा काही मंडळांनी मिरवणुकीला फाटा देऊन त्यावर होणारा खर्च हा विधायक उपक्रमावर केला़ यंदा 342 मंडळांनी शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली़ त्यापैकी जवळपास 30 मंडळांनी वाजत-गाजत मिरवणूक काढली़ सरस्वती तरुण मंडळ, हिंदवी स्वराज्य सुवर्ण गणपती प्रतिष्ठान, क्रांती तालीम तरुण मंडळ, र्शीमंतराजे प्रतिष्ठान, हिंदू रक्षक मित्रमंडळ, आझाद हिंद चौक शिवजन्मोत्सव मंडळ, भगवे वादळ तरुण मंडळ, अ़ भा़ मराठा महासंघ, धर्मवीर शंभूराजे कला-क्रीडा मंडळ, जय महाराष्ट्र तरुण मंडळ यांच्यासह अनेक मंडळांनी लेझीम, झांज खेळाचे सादरीकरण करीत सहभाग नोंदविला़ दुपारी र्शीमंतराजे प्रतिष्ठानच्या वतीने हेलिकॉप्टरमधून शिवाजी चौकात अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी क रण्यात आली़ सायंकाळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचा मेकॅनिक चौकात सत्कार क रण्यात आला़ यावेळी अध्यक्ष श्याम कदम, पोलीस उपायुक्त बाळसिंग रजपूत, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, उपायुक्त अश्विनी सानप,वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे फारुक शेख, रसूल शेख, संतोष धोत्रे, सुहास भोसले, आदिनाथ फडतरे, संघर्ष खंडागळे, किशोर कदम उपस्थित होत़े (प्रतिनिधी)विधायक उपक्रमांवर भर दिला मंडळांनी़़़* भगवे वादळ तरुण मंडळ - पाणी वाटप* अ़ भा़ मराठा महासंघ - शिवप्रसाद वाटप* स्वाभिमानी युथ फाउंडेशन - प्रसाद वाटप* संभाजी ब्रिगेड - मिरवणुकीतील मंडळांचा सत्कार* राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मध्यवर्ती मंडळ - मिरवणुकीतील मंडळ प्रमुखांचा सत्कारलेझर शो अन् डॉल्बीवर थिरकली तरुणाई यंदा काही मंडळांनी नाशिक ढोल टाळून ‘लेझर शो’ला प्राधान्य दिल़े खड्डा तालीम, र्शीमंतराजे प्रतिष्ठान, जय महाराष्ट्र तरुण मंडळ, हिंदवी स्वराज्य सुवर्ण गणपती प्रतिष्ठान, सरस्वती तरुण मंडळ यासह अनेक मंडळांनी डॉल्बी आणि ‘लेझर शो’ वापरून तरुणाईत जल्लोषाचा रंग भरला़ लकी चौक, सरस्वती चौक, प्रभात टॉकीज, मेकॅनिक चौक, भागवत टॉकीज, शिवाजी चौक, बाळीवेस अशा चौकांमध्ये मंडळांची तरुणाई डॉल्बीवर आणि लेझर शोवर थिरकत राहिली़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिवप्रकाशकडून आर्थिक मदतशिवप्रकाश प्रतिष्ठानने मिरवणूक खर्चाला फाटा देत संपूर्ण खर्च आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिला़ शुक्रवारी सायंकाळी चार वाजता चार हुतात्मा पुतळा येथे यशवंत दुधाळ (नान्नज), दत्ता गावडे (द़ सोलापूर), बिस्मिल्ला मुल्ला (द़ सोलापूर), ज्योतिबा माने (अक्कलकोट), सीमा शिंदे (मंगळवेढा), मीनाबाई शिंदे (बार्शी), जयर्शी पाटील (मोहोळ), ज्योती शिंदे (माढा), सोनाली लिगाडे (सांगोला), रोकडे (मंगळवेढा) या दहा कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा दिला़ तत्पूर्वी शेतकरी कुटुंबीयांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महापूजा करण्यात आली़ यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश वानकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहर प्रमुख प्रताप चव्हाण, महिला आघाडीच्या अस्मिता पाटील, चंद्रकांत वानकर, प्रकाश वानकर, महेश धाराशिवकर, सुनील कामाठी, नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, मनोज शेजवाल, शैलेंद्र आमणगी, मंगलाताई वानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.