Jai Shri Ram Saree: 60 मीटर लांब साडी, 13 भाषांमध्ये 32 हजार वेळा लिहीले 'जय श्री राम'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 02:27 PM2022-04-21T14:27:14+5:302022-04-21T14:27:21+5:30

Jai Shri Ram Saree: आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने रेशमची एक अनोखी साडी तयार केली आहे, ज्यावर 32000 वेळा 'जय श्री राम' लिहीलेले आहे.

Jai Shri Ram Saree: 60 meter long saree, 'Jai Shri Ram' written 32 thousand times in 13 languages | Jai Shri Ram Saree: 60 मीटर लांब साडी, 13 भाषांमध्ये 32 हजार वेळा लिहीले 'जय श्री राम'

Jai Shri Ram Saree: 60 मीटर लांब साडी, 13 भाषांमध्ये 32 हजार वेळा लिहीले 'जय श्री राम'

googlenewsNext

Jai Shri Ram Saree:  भगवान श्री रामावरची भक्ती दाखवण्याठी लोक विविध कृत्य करत असतात. अशाच प्रकारचे अनोखे कृत्य आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने केले आहे. धर्मावरम येथील एका हातमागाने 13 भारतीय भाषांमध्ये 32,200 वेळा 'जय श्री राम' लिहिलेली 60 मीटर लांबीची रेशमी साडी तयार केली आहे. 

केवळ जय श्री रामच नाही तर साडीवर सुंदरकांडही
जुजारू नागराजू असे या हातमाग विणकराचे नाव आहे. तो श्री सत्य साई जिल्ह्यातील धर्मावरम येथील रहिवासी आहे. त्याने या अनोख्या सिल्क साडीला 'राम कोटी वस्त्रम' असे नाव दिले आहे. विविध भाषांमध्ये केवळ जय श्री रामच नाही, सुंदरकांड आणि भगवान रामाची 168 वेगवेगळी चित्रे या साडीवर वठवली आहेत.

वैयक्तिक बचतीतून रु. 1.5 लाख गुंतवणूक
हे काम पूर्ण करणे सोपे नव्हते आणि ही अनोखी साडी बनवण्यासाठी खूप मेहनत आणि पैसाही खर्च झाला. नागराजू यांनी 16 किलो रेशमी कापडाची रचना आणि विणकाम करण्यात 4 महिने घालवले. संपूर्ण चार महिने तीन जण रोज कापडं बनवण्याचे काम करायचे. विणकराने उत्कृष्ट नमुना तयार करण्यासाठी त्याच्या वैयक्तिक बचतीतून दीड लाख रुपये गुंतवले. त्याने ही साडी अयोध्येतील रामालयाला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Jai Shri Ram Saree: 60 meter long saree, 'Jai Shri Ram' written 32 thousand times in 13 languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.