जय श्रीराम ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राममंदिराचे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 06:33 AM2020-08-05T06:33:22+5:302020-08-05T06:33:57+5:30

पंतप्रधान मोदी दुपारी सव्वाबारा वाजता मंदिराचे भूमिपूजन करतील

Jai Shriram! Bhumi Pujan of Ram Mandir today at the hands of Prime Minister Narendra Modi | जय श्रीराम ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राममंदिराचे भूमिपूजन

जय श्रीराम ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राममंदिराचे भूमिपूजन

Next

अयोध्या - केवळ देशातील नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होते, त्या राम मंदिराच्या स्वप्नाची पूर्ती बुधवारी होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे.

पंतप्रधान मोदी दुपारी सव्वाबारा वाजता मंदिराचे भूमिपूजन करतील. त्याआधी ते हनुमानगढीला भेट देणार असून, रामलल्ला विराजमानचेही दर्शन घेणार आहेत. देशात बहुधा प्रथमच एखाद्या पंतप्रधानांच्या हस्ते मंदिराच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन होतं असल्याने रामभक्त आणि श्रद्धाळू अत्यंत आनंदात आहेत. अयोध्येत ५ आॅगस्टला दिवाळी असेल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शहरात दीपोत्सव, रांगोळ्या, सर्वत्र सजावट, पूजाअर्चा, आरत्या, शंखनाद, फुलांच्या झळकणाऱ्या माळा यांमुळे प्रत्यक्ष दिवाळी सुरू झाल्याचेच भासत आहे. प्रत्येक जण एकमेकांचे स्वागत जय श्रीरामच्या घोषणेने करीत आहे.

श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला
परत आले, तेव्हा ही नगरी जशी सजली होती,
तसेच चित्र शहरात आहे. भगवे झेंडे, पताका
आणि घराबाहेर अनेकांनी उभारलेल्या गुढ्या
पाहून सण-उत्सवाची ही तयारी दिसत आहे.
श्रीराम पुन्हा एकवार आमच्या शहरात येत
असल्याने हा आमच्यासाठी सण आहे आणि
यापुढे दरवर्षी ५ आॅगस्टला आम्ही तो साजरा
करू, असे अनेकांनी सांगितले.


जय श्रीराम

साडेतीन वर्षांत पूर्णपणे
तयार होईल राममंदिर
मंदिर निर्माणासाठी अंदाजे
३०० कोटी रुपये खर्च
निधी गोळा करण्यासाठी देशभरातील तब्बल १० कोटी कुटुंबांशी संपर्क साधणार

जगातल्या तिसºया क्रमांकाचे हे
मंदिर नेमके कसे असेल?

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राने श्रीरामाच्या प्रस्तावित मंदिराची प्रतिकृती जारी केली. श्रीरामाचे मंदिर हे असे भव्य असणार आहे.
मजली असेल
मंदिर. पूर्वीच्या आराखड्यानुसार ते दोन मजली असणार होते.

फूट असेल
उंची. आधीच्या आराखड्यात ती १२८ फूट होती.

कळस मंदिराला असतील. पूर्वी ते तीन असणार
होते.

असा असेल मोदींचा दौरा

0९.३५ । दिल्लीतून विशेष विमानाने मोदी निघणार
१०.३५ । लखनऊ विमानतळावर होणार लँडिंग
१०.४० । हेलिकॉप्टरने अयोध्यासाठी प्रस्थान करणार
११.३० । अयोध्या येथील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर करणार लँडिंग
१२.०० । रामजन्मभूमी परिसरात पोहोचणार. त्यानंतर दहा मिनिटात रामलल्लाचं दर्शन घेणार. पूजन करणार.
१२.१५ । रामलल्ला परिसरात पारिजातच्या झाडाचं रोप लावणार
१२.३० । भूमिपूजन सुरू होणार
१२.४० । राममंदिराची आधारशिला स्थापन करणार
०१.१० । नृत्यगोपालदास वेदांती यांच्यासह ट्रस्ट कमिटीची भेट घेणार
०२.०५ । साकेल
हेलिपॅडकडे रवाना होणार
०२.२० । हेलिकॉप्टरने लखनऊकडे प्रस्थान करणार

Web Title: Jai Shriram! Bhumi Pujan of Ram Mandir today at the hands of Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.