जय श्रीराम... गायक सोनू निगम अन् संजय निरुपम यांनी घेतलं रामलल्लाचं दर्शन
By महेश गलांडे | Published: January 25, 2021 11:13 AM2021-01-25T11:13:44+5:302021-01-25T11:14:59+5:30
अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमील भेट देण्याची माझी गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती, जी आज पूर्णत्वाला गेली. सनातन धर्मात आस्थेची सर्वात मोठी जागा म्हणजे अयोध्या होय.
अयोध्या - काँग्रेस नेता संजय निरुपम आणि चित्रपट दिग्दर्शक संदीप सिंह यांच्यासमवेत प्रसिद्ध गायक सोनू निगम रविवारी अयोध्येत पोहोचले. त्यानंतर, या सर्वांनीच राम लल्ला आणि बजरंगबलीचं दर्शन घेऊन पूजाही केली. अयोध्येतील राम जन्मभूमी येथील प्रभू श्रीराम यांच्या आरतीतही तल्लीन होऊन पुजेचा भक्तीमय आनंद घेतला. यावेळी बोलाताना, अयोध्या हे भारताचं ह्रदय असल्याचं सोनू निगमने म्हटले. तसेच, मुझे अपनी शरण मे ले लो ही धूनही सोनू यांनी वाजून दाखवली.
अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमील भेट देण्याची माझी गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती, जी आज पूर्णत्वाला गेली. सनातन धर्मात आस्थेची सर्वात मोठी जागा म्हणजे अयोध्या होय. येथे बनविण्यात येणारे प्रभू श्रीराम यांचे मंदिर भारत देशाची शान असेल, असे म्हणत सोनूने राम मंदिराच्या निर्माणसाठी वीट रचण्याची इच्छाही व्यक्त केली. दरम्यान, दुसरीकडे युपी दिवसच्या मुहूर्तावर दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील पत्रकारांनीही अयोध्येत जाऊन प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतले.
दरम्यान, शनिवारी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असतानाच या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. यावरुन तेथील राजकारण आता आणखीनच तापलंय. यावरुन शिवसेनेनं ममता बॅनर्जींना सबुरीचा सल्ला दिलाय. तसेच, जय श्रीराम म्हणूनच भाजपला धडा शिकविण्याचंही सूचवलंय. त्यामुळे, जय श्रीरामच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलचं तापल्याच दिसून येत आहे. त्यातच, सोनू निगम आणि संजय निरुपम यांनी अयोध्या दौरा केला आहे.