जय सियाराम... लाखो विद्युत दिव्यांनी उजळली श्रीराम जन्मभूमी, मोदी म्हणाले प्रेरणास्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 08:33 PM2023-11-12T20:33:44+5:302023-11-12T20:48:56+5:30
अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी घाट परिसरात ‘राम की पौडी’ येथे शनिवारी २२.२३ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
अयोध्या - देशभरात दिवाळीच उत्साह असून सर्वत्र दिवाळीचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा होत आहे. विविध संस्था, संघटना आणि सार्वजनिक जीवनातील क्षेत्रातही दिवाळीचे सेलिब्रेशन सुरू आहे. सर्वसामान्य माणसांपासून ते पंतप्रधानांपर्यंत देशवासीय दिवाळी साजरी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिमाचल प्रदेशमध्ये सैन्याच्या जवानांसह दिवाळी साजरी केली. यावेळी, भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढवत मोदींनी भारताच्या सामर्थ्यांचही वर्णन केलं. त्यानंतर, आता मोदींनी अयोध्या नगरीतून देश प्रकाशमान होत असल्याच म्हटलं आहे.
अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी घाट परिसरात ‘राम की पौडी’ येथे शनिवारी २२.२३ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून निघाला. ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या मते एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने दिव्यांच्या रोषणाईचा हा विश्वविक्रम आहे. ड्रोनच्या साहाय्याने या दिव्यांची गणना करण्यात आली. मागच्या वर्षी अयोध्येत १५.७६ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. त्यामुळे, यंदा हा नवीन विक्रम चरण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोटो शेअर करत येथून देशवासीयांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल, असे म्हटले.
अद्भुत, अलौकिक और अविस्मरणीय!
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2023
लाखों दीयों से जगमग अयोध्या नगरी के भव्य दीपोत्सव से सारा देश प्रकाशमान हो रहा है। इससे निकली ऊर्जा संपूर्ण भारतवर्ष में नई उमंग और नए उत्साह का संचार कर रही है। मेरी कामना है कि भगवान श्री राम समस्त देशवासियों का कल्याण करें और मेरे सभी… pic.twitter.com/3dehLH45Tp
मोदींनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथील दिपोत्सवाचे फोटो शेअर केले आहेत. अद्भूत, अलौकिक आणि अविस्मरणीय अशा शब्दात दिव्यांनी उजळललेल्या अयोध्या नगरीचं मोदींनी कौतुक केलंय. तसेच, देशवायीसांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. लाखो दिव्यांनी उजळलेल्या अयोध्या नगरीतील भव्य दीपोत्सवातून संपूर्ण देश प्रकाशमान झाला आहे. यातून निघणारी ऊर्जा संपूर्ण भारत देशात नवीन उमंग व उत्साह संचार करत आहे. प्रभू श्रीराम सर्व देशवासीयांचे कल्याण करतील आणि माझ्या सर्व कुटुंबातील सदस्यांची प्रेरणाशक्ती बनतील, असे ट्विट मोदींनी केले आहे.
मोदींनी या ट्विटसह दिव्यांनी उजळलेल्या अयोध्या नगरीचे मनमोहक आणि लोभनीय दृश्यही फोटोतून शेअर केले आहे.