10 कोटींचा दंड न भरल्यास शशिकलांना होणार 13 महिन्यांचा तुरुंगवास

By Admin | Published: February 21, 2017 05:05 PM2017-02-21T17:05:57+5:302017-02-21T18:00:22+5:30

शशिकलांनी 10 कोटींचा दंड न भरल्यास त्यांना 13 महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे

Jailed for 13 months if fines not paid for 10 crores | 10 कोटींचा दंड न भरल्यास शशिकलांना होणार 13 महिन्यांचा तुरुंगवास

10 कोटींचा दंड न भरल्यास शशिकलांना होणार 13 महिन्यांचा तुरुंगवास

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 21 - अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व्ही. के. शशिकला बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. मात्र शशिकलांनी 10 कोटींचा दंड न भरल्यास त्यांना 13 महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. शशिकलांनी दंडाच्या स्वरूपात 10 कोटी भरणं गरजेचं आहे. मात्र जर त्या ही रक्कम भरू शकण्यात अपयशी ठरल्या तरी त्यांना 13 महिन्यांचा तुरुंगवास होणार आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक कृष्ण कुमार यांनी दिली आहे.

अण्णाद्रमुकचे महासचिव परपन्ना अग्रहाराही सध्या तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयानं उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याच्या प्रकरणात शशिकला यांना दोषी ठरवलं आहे. तसेच त्यांच्यासोबत दोषी आढळलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनाही चार वर्षांचा कारावास आणि 10 कोटींचा दंड ठोठावला आहे.

तत्पूर्वी शशिकलांना न्यायालयानं चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यातील 21 दिवसांची शिक्षा त्यांनी भोगली आहे. मात्र त्यातच आता 10 कोटींचा दंड न भरल्यास त्यांना 13 महिन्यांचा तुरुंगवास मिळणार आहे. शशिकला, इलावरासी आणि सुधाकरन यांना कोणतीही विशेष सुविधा पुरवली जात नाही. सुरक्षेच्या कारणास्तव शशिकला आणि इलावरासी यांना महिला ब्लॉकमधल्या छोट्या खोलीत ठेवण्यात आलं आहे. तसेच डॉक्टर वेळोवेळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असल्याची माहितीही कारागृह अधीक्षक कृष्ण कुमार यांनी दिली आहे.

Web Title: Jailed for 13 months if fines not paid for 10 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.