अमरनाथमध्ये अडकलेले जिल्ह्यातील भाविक जम्मूकडे सुखरूप परतले गुरुवारी जळगावात परतणार : सुरक्षा दलातील जवानांची कडक सुरक्षा
By admin | Published: July 12, 2016 12:10 AM2016-07-12T00:10:12+5:302016-07-12T00:10:12+5:30
जळगाव : काश्मीरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा स्थगित केल्याने अमरनाथचे प्रवेशद्वार असलेल्या बालटालमध्ये अडकलेले खान्देशातील एक हजारापेक्षा जास्त भाविक सोमवारी जम्मू येथे परतले. यातील जळगाव शहरातील भाविकही सुखरूप असून, त्यांनी दुपारी वैष्णव देवीचे दर्शन घेतल्याची माहिती मिळाली आहे.
Next
ज गाव : काश्मीरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा स्थगित केल्याने अमरनाथचे प्रवेशद्वार असलेल्या बालटालमध्ये अडकलेले खान्देशातील एक हजारापेक्षा जास्त भाविक सोमवारी जम्मू येथे परतले. यातील जळगाव शहरातील भाविकही सुखरूप असून, त्यांनी दुपारी वैष्णव देवीचे दर्शन घेतल्याची माहिती मिळाली आहे. अमरनाथ यात्रेसाठी जळगावसह खान्देशातून भाविक मोठ्या प्रमाणात जात असतात. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्यांचा एक ग्रुप अमरनाथ यात्रेला काही दिवसांपूर्वी रवाना झाला होता. त्यात कांदा व्यापारी चंद्रकांत अशोक पाटील, राजू रमेश ठाकूर, भरत वासुदेव पाटील, अजय पाटील, सुभाष भोई हे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत जळगाव येथील एलआयसीचे अधिकारी श्याम कोठावदेही आहेत. परंतु काश्मिरातील हिंसाचारामुळे हेे व्यापारी शनिवार व रविवार बालटालमध्येच अडकले होते. ताणावग्रस्त स्थिती, रस्त्यांवर जळते टायर, दगडरविवारी बालटालमध्ये ५० रुपये लीटर या दरात पिण्याचे पाणी मिळत होते. भाविकांमधील भीती व अडचणी लक्षात घेता. सुरक्षा दलातील अधिकार्यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर (रात्री २ वाजता) बालटालमध्ये अडकलेल्या सर्व दोन हजार भाविकांना ८०० लहान खाजगी चारचाकींमधून बालटालमधून श्रीनगरकडे आणले. भाविकांच्या चारचाकींच्या मागे व पुढे सुरक्षा दलातील जवान, अधिकारी यांच्या अनेक मोटारी होत्या. बालटाल ते श्रीनगर या दरम्यानच्या रस्त्यांवर दगडांचा खच होता. अनेक ठिकाणी टायर जाळले होते. ते दगड दूर करीत सुरक्षा दलातील जवानांनी भाविकांना श्रीनगरपुढे ५० कि.मी.पर्यंत सोडले. भाविक जम्मूमध्येसोमवारी सकाळी भाविक जम्मू येथे सुरक्षित परतले. त्यांनी वैष्णव देवीचे दर्शन घेतले. येत्या गुरुवारी जळगाव शहरातील व्यापार्यांचा ग्रुप व इतर भाविक जम्मू येथून विमानाने मुंबईत येणार आहे. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत हे भाविक शहरात परततील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.