मृत्यूच्या काही क्षणापूर्वीच ‘तिने’ शेअर केला अखेरचा फोटो; चेहऱ्यावरील हास्य पाहून सगळेच स्तब्ध झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:01 PM2021-07-26T12:01:49+5:302021-07-26T12:03:19+5:30
Dr. Deepa Sharma: दीपा शर्मा सोशल मीडियावर खूप फेमस आहे. जेव्हा ती पहिल्यांदा एकटी प्रवास करत होती तेव्हापासून ती सोशल मीडियात तिच्या प्रवासाबद्दल अपडेट देत राहते
नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशच्या किन्नोर इथं रविवारी एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी जीवनातील काही क्षण आनंदाचे घालवण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला आहे. पहाडी परिसरात दरड कोसळल्यानं सर्वकाही वाहून गेले. किन्नौर येथील या दुर्घटनेत एकूण ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. याच मृतांमध्ये आयुर्वेदाची डॉक्टर दीपा शर्माचा समावेश होता.
दीपा शर्मा सोशल मीडियावर खूप फेमस आहे. जेव्हा ती पहिल्यांदा एकटी प्रवास करत होती तेव्हापासून ती सोशल मीडियात तिच्या प्रवासाबद्दल अपडेट देत राहते. परंतु कुणालाही ठाऊक नव्हतं की हा प्रवास तिचा शेवटचा असेल. किन्नौरमध्ये दरड कोसळल्यानं डॉ. दीपा शर्माचा मृत्यू झाला. रविवारी जेव्हा ही दुर्घटना घडली त्याच्या काही वेळेपूर्वी दीपा शर्मानं तिच्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला होता.
Standing at the last point of India where civilians are allowed. Beyond this point around 80 kms ahead we have border with Tibet whom china has occupied illegally. pic.twitter.com/lQX6Ma41mG
— Dr.Deepa Sharma (@deepadoc) July 25, 2021
या फोटोत दीपानं म्हटलं होतं की, मी सध्या भारताच्या शेवटच्या टोकावर उभी आहे. ज्याठिकाणी कुठल्याही सामान्य नागरिकाला जाण्याची परवानगी नाही. याठिकाणाच्या ८० किमी. अंतरावर तिबेट आहे ज्यावर चीनने कब्जा केला आहे. दीपाच्या या फोटोला अनेकांनी लाईक्स केले. फोटोत तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. परंतु हा तिचा अखेरचा फोटो ठरेल याची कल्पनाही कुणी केली नसेल. ३४ वर्षीय दीपा शर्माचं अचानक या जगातून निघून जाणं तिच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे.
Life is nothing without mother nature. ❤️ pic.twitter.com/5URLVYJ6oJ
— Dr.Deepa Sharma (@deepadoc) July 24, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
किन्नौरच्या अपघातात दीपा शर्मासह ९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला. दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली. त्याशिवाय मृतकांच्या वारसांना नुकसाई भरपाई देण्याचीही घोषणा केली आहे. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जेव्हा सांगला-छितकुल रोडवर अचानक डोंगरावरून दगड खाली पडू लागले. काही क्षणातच याठिकाणी सगळं उद्ध्वस्त झालं. यावेळी खाली असलेला पूलावरील सर्व गाड्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी याठिकाणाहून जाणारी रिक्षाही दुर्घटनाग्रस्त झाली.