आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंग चौधरी याची हकालपट्टी; ६ वर्षांपूर्वीही द्वेष प्रकरणाचा होता आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 09:02 AM2023-08-17T09:02:41+5:302023-08-17T09:03:23+5:30

जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट ट्रेनमध्ये एका आरपीएफ कॉनस्टेबलने गोळीबार केला होता.

jaipur mumbai train firing case rpf constable chetansinh chaudhary dismissed faced probe in another hate case 6 years ago | आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंग चौधरी याची हकालपट्टी; ६ वर्षांपूर्वीही द्वेष प्रकरणाचा होता आरोप

आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंग चौधरी याची हकालपट्टी; ६ वर्षांपूर्वीही द्वेष प्रकरणाचा होता आरोप

googlenewsNext

जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका वरिष्ठ सहकाऱ्याची आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाचे कॉन्स्टेबल चेतन सिंह चौधरी याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. चौधरी याला बडतर्फ करण्याचा आदेश आरपीएफच्या मुंबई सेंट्रलच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी १४ ऑगस्ट रोजी जारी केला होता. आरपीएफचे एएसआय टिकाराम मीणा यांच्याशिवाय अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन भानपुरवाला (५८) पालघरमधील नालासोपोरा, असगर अब्बास शेख (४८, बिहारमधील मधुबनी येथील रहिवासी) आणि सय्यद एस. (४३) या संपूर्ण प्रकरणातील आरोपी चेतन सिंह हा बोरिवली न्यायालयाच्या आदेशानंतर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

सर्जन डॉक्टरला ‘गुगल पे’वर ‘गुगली’; डान्स शिकवणाऱ्यालाच घातला गंडा

आरोपी कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरीचा त्याच्या सेवेदरम्यान त्याच्यावर ३ आरोप आहेत. यात  आरपीएफ पोस्टवर एका व्यक्तीला जातीवरुन त्रास दिल्या संबंधित 'द्वेषी प्रकरण' देखील समाविष्ट आहे. या संदर्भात चालू तपासाचा हवाला देत अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. चौधरी जेव्हा २०१७ मध्ये उज्जैनमध्ये आरपीएफ श्वान पथकात तैनात होते तेव्हा त्याच्याकडे चौकशी करण्यात आली होती.

१८ फेब्रुवारी २०१७ रोजी तो ऑफ ड्यूटी असताना आणि नागरी कपड्यांमध्ये असताना त्याने वाहिद खान नावाच्या व्यक्तीला पोस्टवर आणले आणि कथितरित्या त्याच्यावर कोणतेही कारण नसताना मारहाण आणि त्याचा छळ केला. त्याच्या वरिष्ठांना ही बाब कळताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि नंतर त्याच्या कृत्याबद्दल त्याला शिक्षाही केली.

२०११ मध्ये आणखी एका घटनेत, आता काढून टाकण्यात आलेले चेतनसिंह चौधरी याच्यावर देखील हरियाणातील जगाधरी येथे तैनात असताना एका सहकाऱ्याच्या एटीएम कार्डमधून २५,००० रुपये काढल्याचा आरोप होता, त्याचीही चौकशी करण्यात आली होती.

दुसर्‍या तिसर्‍या घटनेत, भावनगर, गुजरातमध्ये पोस्टिंगदरम्यान एका सहकाऱ्याला कथितपणे मारहाण केल्याचे प्रकरण देखील समोर आले. विभागीय चौकशीनंतर चौधरी याची दुसऱ्या युनिटमध्ये बदली करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, RPF तपास पथकाने ३१ जुलैच्या घटनेबाबत चौधरी यांचे सध्याचे आणि माजी सहकारी आणि वरिष्ठांचे जबाब नोंदवून घेतले होते.

Web Title: jaipur mumbai train firing case rpf constable chetansinh chaudhary dismissed faced probe in another hate case 6 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.