जैसलमेरमध्ये उन्हाचा जबर तडाखा..! BSF जवान वाळूवर भाजतात पापड..

By admin | Published: May 23, 2016 03:03 PM2016-05-23T15:03:32+5:302016-05-23T15:03:50+5:30

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये उन्हाचा जबर तडाखा बसला असून बीएसएफ जवान चक्क वाळूवर पापड भाजत आहेत.

Jaisalmer hit the heat ..! BSF jumps on roasted sand. | जैसलमेरमध्ये उन्हाचा जबर तडाखा..! BSF जवान वाळूवर भाजतात पापड..

जैसलमेरमध्ये उन्हाचा जबर तडाखा..! BSF जवान वाळूवर भाजतात पापड..

Next
>ऑनलाइन लोकमत
जैसलमेर, दि. २३ - संपूर्ण भारताला कडाक्याच्या उन्हाचा जबर फटका बसला असून राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तर अजूनच बिकट अवस्था झाली आहे. जैसलमेरमधील उन्हाचा कडाका इतका आहे की भारत-पाकिस्तान बॉर्डवर बीएसएफ जवान चक्क वाळूवर पापड शेकत आहेत. एवढचं नव्हे तर त्यांच्या सांगण्यानुसार या ऊन्हामध्ये ते भातही शिजवू शकतात. एका भांड्यात पाण्यात तांदूळ घालून ते बाहेर ठेवल्यास अवघ्या दोन-तीन तासांत भात शिजतो, असे काही जवानांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरमध्ये सध्या सर्वाधिक म्हणजे ५५ डिग्री तापमान आहे, मात्र हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान ४७.६ डिग्री इतके नोंदवले गेले होते. 
'फोकस एनर्जी' या खासगी फर्मने दिलेल्या माहितीनुसारही, सध्या या भागात पारा ५४.५ डिग्रीच्या वर पोचला आहे.
अतिशय उष्ण वातावरणामुळे जवानांसाठी येथे राहणे कठीण होत चालले आहे. डोक्यावर टोपी आणि उन्हापासून संरक्षण करणारे कपडे घालूनही जवानांना उन्हाचा जबर फटका बसत आहे. काही जवानांनुसार, तापत्या वाळूत चालताना अनेकदा त्यांचे बूटही वितळल्याच्या घटना घडल्या.

Web Title: Jaisalmer hit the heat ..! BSF jumps on roasted sand.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.