मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 09:46 AM2019-09-25T09:46:07+5:302019-09-25T10:00:07+5:30

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

Jaish-e-mohmmed want's to target PM Narendra Modi & NSA Ajit Doval | मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव

मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव

Next
ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या जिव्हारी कलम 370 हटवण्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना मोठा हल्ला करण्याच्या तयारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना दहशतवाद्यांचे एक विशेष पथक पाठवण्याची तयारी

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कलम 370 हटवण्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, कलम 370 हटवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना दहशतवाद्यांचे एक विशेष पथक पाठवण्याची तयारी जैशने केली आहे. तसेच आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचा एक मेजर या हल्ल्याच्या तयारीसाठी जैशला मदत करत, असल्याचे गुप्तहेर संघटनांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीममधून समोर आले आहे.

 एका परदेशी गुप्तहेर संघटनेला जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतावादी संघटनेचा दहशतवादी शमशेर वाणी आणि त्याच्या म्होरक्या यांच्यात झालेल्या संभाषणाची गुप्त माहिती एका  परदेशी दहशतवादी संघटनेला मिळाली. त्यानंतर या गुप्तहेर संघटनेने ही माहिती भारताच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना दिली. 

 दरम्यान, या गोपनीय माहितीच्या आधारावर जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जयपूर, गांधीनगर, कानपूर आणि लखनौसह  एकूण 30 अत्यंत संवेदनशील शहरांमध्ये पोलिसांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबरोबरच अजित डोवाल यांच्या सुरक्षा व्यवस्थेचीही तपासणी करण्यात आली आहे. अजित डोवाल यांनी पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे ते दहशतवादी संघटनांच्या रडारवर आहेत.  

 दरम्यान, काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने जैश ए मोहम्मदच्या एकेका दहशतवाद्याला शोधून शोधून टिपले आहे. त्यामुळे त्याचा खवळलेला जैशचा  म्होरक्या आपल्या दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आसुसला आहे. दरम्यान,  5 ऑगस्टनंतर नियंत्रण रेषेवरून आत्मघाती दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र या घुसखोरीचे अनेक प्रयत्न सीमेवर सतर्क असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडले आहेत.  

Web Title: Jaish-e-mohmmed want's to target PM Narendra Modi & NSA Ajit Doval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.