एक्साईज ड्युटी मागे घेण्यास जेटलींचा नकार

By admin | Published: April 28, 2016 01:36 AM2016-04-28T01:36:27+5:302016-04-28T01:36:27+5:30

सोन्याच्या दागिन्यांवरील १ टक्का एक्साईज ड्युटी मागे घेण्याची देशातल्या ज्वेलर्स असोसिएशनची मागणी मान्य करणे शक्य नाही.

Jaitley denies withdrawing excise duty | एक्साईज ड्युटी मागे घेण्यास जेटलींचा नकार

एक्साईज ड्युटी मागे घेण्यास जेटलींचा नकार

Next

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली -सोन्याच्या दागिन्यांवरील १ टक्का एक्साईज ड्युटी मागे घेण्याची देशातल्या ज्वेलर्स असोसिएशनची मागणी मान्य करणे शक्य नाही. मात्र ज्या इन्स्पेक्टर राजची भीती सुवर्णकारांना वाटते ती दूर करण्यासाठी मार्ग काढायला सरकार तयार आहे, असे अर्थमंत्री अरूण जेटलींनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे राज्यसभा राजमल लखीचंद चे संचालक ईश्वरलाल जैन यांनी ही माहिती दिली.
सरकारने सुवर्णकारांवर लादलेल्या एक्साईजच्या विरोधात ज्वेलर्सनी ४२ दिवसांचा संप केला होता. सरकार व सुवर्णकार यांच्यात यानंतर काहीतरी तडजोडीची मार्ग निघू शकतो काय, हे पाहण्यासाठी खा. जैन यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे खा. विजय दर्डाही उपस्थित होते.
सुवर्णालंकारांवर १ टक्का कर भरण्यास ज्वेलर्सचा विरोध नाही. तथापि एक्साईज ड्युटीच्या निमित्ताने होणारा ‘इन्सपेक्टर राज’चा त्रास त्यांना नको आहे. हा कर अन्य मार्गाने भरण्यास ज्वेलर्स तयार होतील. त्यासाठी या जाचातून सुवर्णकार व अलंकार व्यावसायिकांची सरकारला प्रथम मुक्तता करावी, अशी मागणी खा. जैन यांनी केली.
त्यावर अर्थमंत्री जेटली म्हणाले, त्यासाठी एक समितीही नियुक्त केली आहे. त्या समितीत ज्वेलर्स असोसिएशनचे तीन प्रतिनिधीही या समितीत असावेत, असा सरकारचा आग्रह आहे. समितीच्या शिफारशींवर सरकार खुल्या दिलाने विचार करायला तयार आहे. पण ज्वेलर्स असोसिएशननी तीन प्रतिनिधींची नावे सरकारकडे पाठवलेली नाहीत.
परदेशातून भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात होते. सरकारला १0 टक्के दरानुसार आयातीवर सुमारे २५ हजार कोटींचा कर मिळतो, (पान ६ वर)

Web Title: Jaitley denies withdrawing excise duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.