जनतेला सरकारकडून खूप अपेक्षा - जेटली
By admin | Published: February 1, 2017 11:17 AM2017-02-01T11:17:05+5:302017-02-01T11:26:11+5:30
आमच्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. सरकारकडे जनतेच्या संपत्तीचे पहारेकरी म्हणून पाहिले जात आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 1 - आमच्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. सरकारकडे जनतेच्या संपत्तीचे पहारेकरी म्हणून पाहिले जात आहे. महागाईवर सरकारने नियंत्रण मिळवले, काळयापैशा विरोधात सरकारने लढाई सुरु केली आहे. विकासाची गंगा मजूर, महिला शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे सांगत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.
यावेळी रेल्वे बजेट आणि केंद्रीय अर्थसंकल्प पहिल्यांदाच एकत्रित सादर होत आहे. मागच्या अडीचवर्षात सरकारच्या कारभारात बदल झाला असून, लोकांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे. जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडलेली असतानाच मी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे, महागाईवर सरकारने नियंत्रण मिळवले, काळयापैशा विरोधात सरकारने लढाई सुरु केली आहे, असे जेटली यांनी सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार जगातला जीडीपी 2017मध्ये 3.4 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.