मंत्रिमंडळात जेटली नाहीत; शहा येण्याची शक्यता, आज शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:31 AM2019-05-30T06:31:39+5:302019-05-30T06:33:13+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या, गुरुवारी होणाऱ्या शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवनात जोरात सुरू

Jaitley is not in the Cabinet; The possibility of getting Shah, today swear | मंत्रिमंडळात जेटली नाहीत; शहा येण्याची शक्यता, आज शपथविधी

मंत्रिमंडळात जेटली नाहीत; शहा येण्याची शक्यता, आज शपथविधी

Next

- हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवनात जोरात सुरू असून, नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली नसतील व अमित शहा यांचा मात्र समावेश होईल आणि त्यांना अर्थमंत्रिपद मिळू शकेल, अशी चर्चा आहे. जेटली यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपणास मंत्री करू नये, अशी विनंती मोदी यांनी बुधवारी केली.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे पद व खाते कायम राहील. सुषमा स्वराज यांना मंत्री होण्याची इच्छा नसल्यास, परराष्ट्र खाते निर्मला सीतारामन यांना मिळेल, असे समजते. पीयूष गोयल यांचा समावेश निश्चित आहे. जेटली यांनी आपली प्रकृती सुधारल्यानंतर काम करू शकू, असे म्हटले आहे. उद्या ६0 ते ७0 जणांचा शपथविधी होईल, असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार व राजस्थान या राज्यांतून मिळून सर्वाधिक मंत्री असतील, असा अंदाज आहे. शिवसेना, जनता दल (यू), अकाली दल, अपना दल, लोक जनशक्ती पार्टी, रिपब्लिकन पार्टी, अण्णाद्रमुक यांनाही स्थान द्यायचे असल्याने भाजपच्या मंत्र्यांची संख्या कदाचित कमी असू शकेल.
रविशंकर प्रसाद, नरेंद्र सिंह तोमर,
स्मृती इराणी, थावरचंद गेहलोत, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी यांची नावे निश्चित असल्याचे समजते. अनिल बलुनी, तेजस्वी सूर्या, अपराजिता सरंगी, हरदीप पुरी, भारती घोष, बृजेंदर सिंह, कृष्णपाल गुज्जर, चौधरी बिरेंदर सिंह, डॉ. हर्षवर्धन, विजय गोयल आणि मनोज तिवारी हेही शर्यतीत आहेत.
>सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित राहणार
नरेंद्र मोदी यांच्या आणि नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ््याला यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे उपस्थित राहणार आहेत.
>मोदी यांच्या शपथविधीला ६,५00 पाहुण्यांची उपस्थिती
नवी दिल्ली : आपल्या नव्या मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी तब्बल पाच तास चर्चा केली. नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या, गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार असून, या समारंभाचे निमंत्रण ६५00 जणांना देण्यात आले आहे. या दोघांतील चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही.

Web Title: Jaitley is not in the Cabinet; The possibility of getting Shah, today swear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.