जेटलींनी सादर केला 'उत्तम' अर्थसंकल्प
By admin | Published: February 1, 2017 03:07 PM2017-02-01T15:07:32+5:302017-02-01T15:12:04+5:30
वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज 'उत्तम' अर्थसंकल्प सादर केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज 'उत्तम' अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून FUTURE अर्थात शेतकरी, वंचितांचा विकास, पारदर्शकता, शहरी विकास, ग्रामीण विकास आणि रोजगार यांच्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच आज केंद्रीय अर्थसंकल्पामधून रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात आला. पंतप्रधान मोदींनी रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पाला जोडणे ऐतिहासिक पाऊल असल्याचे सांगत ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी जेटलींचे अभिनंदन केले. "या अर्थसंकल्पामुळे विकासाला चालना मिळेल, शिक्षण ते उद्योग प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे," असे ते म्हणाले.
शेतकरी, ग्रामीण भारत, गरीब, शोषित यांच्या विकासावर अर्थसंकल्पातून भर देण्यात आल्याचे सांगत मोदींनी अर्थसंकल्पातील काही ठळक बाबींवरही प्रकाश टाकला. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, या अर्थसंकल्पामुळे देशातील प्रत्येक वर्गाचे स्वप्न साकार होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
रेल्वे अर्थसंकल्पातून सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिल्याने करचोरी आणि काळ्या पैशावार नियंत्रण आणता येईल. सध्या विविध बदलांमधून जात असलेल्या आपल्या देशात ही बदलाची प्रक्रिया सुलभपणे पार पडण्यासाठी अर्थसंकल्पातून हातभार लागेल अशी आशाही मोदींनी व्यक्त केली.
Budget mein sabse zyada zor kisaan, gaaon, garib, Dalit, peedit, shoshit pe kendrit kiya gaya hai: PM #Budget2017pic.twitter.com/BIOlsKO98s
— ANI (@ANI_news) February 1, 2017
In many ways this budget will facilitate the changes that our country is going through: PM Modi #Budget2017pic.twitter.com/AO3TIxpfLa
— ANI (@ANI_news) February 1, 2017