हेलिकॉप्टरमध्ये चढताना पडल्याने जेटलींना किरकोळ दुखापत
By admin | Published: March 12, 2017 06:04 PM2017-03-12T18:04:28+5:302017-03-12T18:04:28+5:30
हेलिकॉप्टरमध्ये चढताना पाय घसरून पडल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना दुखापत झाली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - हेलिकॉप्टरमध्ये चढताना पाय घसरून पडल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना दुखापत झाली आहे. जेटली आज योग गुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली योगपीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हरिद्वार येथे गेले होते. त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये चढताना त्यांचा पाय घसरला. मात्र जेटलींना किरकोळ दुखापत झाली असून, प्राथमिक उपचारानंतर ते दिल्लीला परतले आहेत.
हेलिकॉप्टरमध्ये चढताना पडल्याने झालेल्या दुखापतीमुळे जेटलींना काही काळ भोवळ आली होती. दरम्यान, या घटनेनंतर पतंजली योगपीठात उपस्थित डॉक्टरांनी जेटलींवर तातडीने उपचार केले. त्यांची प्रकृती सुधारल्यावर जेटलींना दिल्लीला पाठवण्यात आले. अरुण जेटलींना आज संध्याकाळी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात होणाऱ्या पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत भाग घ्यायचा आहे. निकटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण जेटली यांची तब्येत सामान्य आहे. मात्र ते बैठकीत सहभागी होतील की नाही याबाबत साशंकता आहे.
Finance Minister Arun Jaitley who had a minor injury while boarding a chopper in Haridwar, reaches Delhi. His health is fine. pic.twitter.com/IioVVBQwx4
— ANI (@ANI_news) March 12, 2017