राज्यसभा सदस्यत्वाची जेटलींनी घेतली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 03:39 AM2018-04-16T03:39:18+5:302018-04-16T03:39:18+5:30
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांची मुदत सहा वर्षांची असून, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांच्या दालनात जेटली यांना पदाची शपथ दिली गेली. जेटली उत्तर प्रदेशातून गेल्या महिन्यात निवडून गेले.
नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांची मुदत सहा वर्षांची असून, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांच्या दालनात जेटली यांना पदाची शपथ दिली गेली. जेटली उत्तर प्रदेशातून गेल्या महिन्यात निवडून गेले.
सध्या जेटली यांच्यावर मूत्रपिंडाचा उपचार सुरू असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रमात त्यांना शपथ दिली गेली. स्वत: जेटली यांनी राज्यसभेतील उत्तर प्रदेशचा प्रतिनिधी या नात्याने १५ एप्रिल २०१८ रोजी शपथ घेतल्याचे टिष्ट्वटरद्वारे सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री अनंतकुमार, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, हरदीप एस. पुरी, विजय गोयल आणि विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आदी यावेळी उपस्थित होते.