जेटलींचा केजरीवालांविरोधात दुस-यांदा 10 कोटींचा मानहानीचा दावा

By Admin | Published: May 22, 2017 03:39 PM2017-05-22T15:39:10+5:302017-05-22T15:39:10+5:30

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दुस-यांदा केजरीवालांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Jaitley's claim for defamation of Rs 10 crore for Kejriwal's second term | जेटलींचा केजरीवालांविरोधात दुस-यांदा 10 कोटींचा मानहानीचा दावा

जेटलींचा केजरीवालांविरोधात दुस-यांदा 10 कोटींचा मानहानीचा दावा

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दुस-यांदा केजरीवालांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. जेटलींच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयात 10 कोटी रुपयांचा मानहानीचा दुसरा खटला केजरीवालांविरोधात भरला आहे. जेटलींनी केजरीवालांविरोधात पहिल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीवेळी केजरीवालांचे वकील राम जेठमलानी यांनी क्रूक(शातिर) या शब्दाचा वापर केला होता. त्यावर जेटलींनी नाराजी व्यक्त करत मानहानीची रक्कम वाढवण्याचा इशारा दिला होता. गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानी प्रकरणातल्या खटल्यात सुनावणी सुरू होती.

त्याच वेळी केजरीवाल यांचे वकील राम जेठमलानी यांनी जेटलींविरोधात क्रूक या शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर दोन्ही पक्षकारांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर कोर्टानं सुनावणी स्थगित केली. केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या इतर नेत्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या 10 कोटींच्या मानहानीच्या खटल्यात जेटलींचा जबाब नोंदवला गेला नाही. वकील जेठमलानींनी अरुण जेटलींविरोधात वापरण्यात आलेल्या अपशब्दावर कोर्टानं आपत्ती दर्शवली होती.

संयुक्त रजिस्ट्रार दीपाली शर्मांसमोर अर्थमंत्री जेटलींनी जेठमलानींना विचारलं की, केजरीवालांच्या निर्देशानुसारच तुम्ही माझ्याविरोधात अपशब्द वापरले आहेत का. जेटली म्हणाले, जर केजरीवालांच्या निर्देशावरून तुम्ही माझ्याविरोधात अपशब्द वापरत असल्यास मी केजरीवालांविरोधात आरोप वाढवेन, वैयक्तिक द्वेषाचीही एक मर्यादा असते, असंही जेटलींनी जेठमलानींना सुनावलं होतं. 

अरुण जेटलींनी 13 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत डीडीसीएला फिरोजशहा कोटला स्टेडिअमसाठी नियम धाब्यावर बसवून परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. केजरीवालांनी केलेल्या आरोपांमुळे डीडीसीएची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत डीडीसीए आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी केजरीवालांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. डीडीसीएच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचेही डीडीसीएने आपल्या अर्जात म्हटले होते. दरम्यान, केजरीवालांच्या वक्तव्यामुळे डीडीसीएची प्रतिमा डागाळल्याचं न्यायालयाने मान्य केलं होतं. त्यानंतर जेटलींनीही केजरीवालांविरोधात मानहानीचा खटला भरला होता. 

Web Title: Jaitley's claim for defamation of Rs 10 crore for Kejriwal's second term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.