...तर मानहानीची रक्कम वाढवेन, जेटलींचा जेठमलानींना इशारा
By admin | Published: May 17, 2017 07:50 PM2017-05-17T19:50:43+5:302017-05-17T19:50:43+5:30
केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांच्यात दिल्ली उच्च न्यायालयात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांच्यात दिल्ली उच्च न्यायालयात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. जेटलींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांविरोधात केलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीदरम्यान हा वाद उफाळून आला आहे.
केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या इतर नेत्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या 10 कोटींच्या मानहानीच्या खटल्यात जेटलींचा जबाब नोंदवला गेला नाही. वकील जेठमलानींनी अरुण जेटलींविरोधात वापरण्यात आलेल्या अपशब्दावर कोर्टानं आपत्ती दर्शवली आहे. संयुक्त रजिस्ट्रार दीपाली शर्मांसमोर अर्थमंत्री जेटलींनी जेठमलानींना विचारलं की, केजरीवालांच्या निर्देशानुसारच तुम्ही माझ्याविरोधात अपशब्द वापरले आहेत. जेटली म्हणाले, जर केजरीवालांच्या निर्देशावरून तुम्ही माझ्याविरोधात अपशब्द वापरत असल्यास मी केजरीवालांविरोधात आरोप वाढवेन, वैयक्तिक द्वेषाचीही एक मर्यादा असते, असंही जेटलींनी जेठमलानींना सुनावलं आहे.
तत्पूर्वी अरुण जेटलींच्या 13 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत डीडीसीएमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. जेटलींच्या कारकिर्दीत डीडीसीएला फिरोजशहा कोटला स्टेडिअमसाठी नियम धाब्यावर बसवून परवानगी मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. केजरीवालांनी केलेल्या आरोपांमुळे डीडीसीएची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत डीडीसीए आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी केजरीवालांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. डीडीसीएच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचेही डीडीसीएने आपल्या अर्जात म्हटले होते. दरम्यान, केजरीवालांच्या वक्तव्यामुळे डीडीसीएची प्रतिमा डागाळल्याचं न्यायालयाने मान्य केलं होतं.