हद्द शहराची नोटीस मात्र जळगाव बुद्रुकची आक्षेप: महामार्गाच्या भूसंपादन मोजणीसाठी १८ गटधारकांना नोटीस
By admin | Published: December 23, 2015 12:18 AM2015-12-23T00:18:26+5:302015-12-23T00:18:26+5:30
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती आली आहे. त्यानुसार भूमि अभिलेख कार्यालयाने जळगाव शहर हद्दीतील १८ शेतगट मालकांना शेतीच्या मोजणीसंदर्भात नोटीस दिली आहे. जळगाव शहर हद्दीतील शेतजमिन असली तरी भूमि अभिलेख कार्यालयाने या सर्वांना जळगाव बुद्रुक भागातील शेत गटनावाने नोटीस बजावली आहे. शेतकर्यांनी जमिनीच्या मोजणीला आक्षेप नोंदविला आहे.
Next
ज गाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती आली आहे. त्यानुसार भूमि अभिलेख कार्यालयाने जळगाव शहर हद्दीतील १८ शेतगट मालकांना शेतीच्या मोजणीसंदर्भात नोटीस दिली आहे. जळगाव शहर हद्दीतील शेतजमिन असली तरी भूमि अभिलेख कार्यालयाने या सर्वांना जळगाव बुद्रुक भागातील शेत गटनावाने नोटीस बजावली आहे. शेतकर्यांनी जमिनीच्या मोजणीला आक्षेप नोंदविला आहे.अमरावती ते चिखली, चिखली ते फागणे व फागणे ते नवापूर अशा तीन टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम होणार आहे. चौपदीकरणासाठी जळगाव जिल्ातून एकूण ३८० हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. पैकी २७५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. जळगाव शहरातून जाणार्या मार्गाचे भूसंपादन तसेच जमिनीची मोजणीचे काम बाकी आहे. त्यानुसार जळगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत शहर हद्दीतील १८ शेतमालकांना मोजणीसाठी नोटीस पाठविली आहे.हद्द शहराची नोटीस मात्र जळगाव बुद्रुकचीभूमि अभिलेख कार्यालयाने सर्व शेतकर्यांना जळगाव बुद्रुक या नावाने नोटीस बजावली आहे. मात्र प्रत्यक्षात ही हद्द जळगाव शहरातील असल्याचे शेतमालकांचे म्हणणे आहे. ज्या शेतकर्यांच्या जमिनीची मोजणी होणार आहे, त्या शेतकर्यांनी जळगाव शहर या नावाने जिल्हा प्रशासनाने मोजणी करावी तसेच मोजणी करतेवेळी नकाशे हे जळगाव शहराच्या नावाने असावे असा पवित्रा घेतला आहे. प्रशासन जो पर्यंत शेतकर्यांच्या या दोन अटी मान्य करीत नाही तोपर्यंत जमिनीची मोजणी करू देणार नाही असा पवित्रा घेण्यात आला आहे.शहराचा नकाशा आजही जळगाव बुद्रुक नावानेचगॅझेटमध्ये तांडेज गावाचा काही भाग असलेल्या जळगाव शहराचा नकाशा हा आजही जळगाव बुद्रुक नावाने आहे. तर सात बारा उतारे हे १०० वर्षांपासून शहराच्या नावाने आहे. जिल्हा प्रशासन भूमि अभिलेख कार्यालयाकडे असलेल्या उतार्यांच्या आधारावर मोजणी करण्यासाठी आग्रही आहे. तर शेतकरी हे जळगाव शहरांच्या उतार्यानुसार मोजणी व्हावी या मागणीवर शेतकरी ठाम आहे. काही महिन्यांपूर्वी भूसंपादन केलेल्या जमिनीची मोजणी ही जळगाव बुद्रुक नावाने केली आहे. यावेळी या भागात २० रुपये फूट आणि २०० रुपये मीटर अशा रेडिरेकनरची आकारणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र शहर हद्दीतील रेडिरेकनरचा दर हा मीटरला दहा हजाराच्या जवळपास आहे.