जळगाव सी.ए. शाखेतर्फे चर्चासत्र
By admin | Published: February 29, 2016 10:02 PM2016-02-29T22:02:45+5:302016-02-29T22:02:45+5:30
Next
>फोटो कॅप्शन- चर्चासत्रात मार्गदर्शन करताना अनिलकुमार शाह. डावीकडे साहेबराव पाटील, उजवीकडून जळगाव शाखेचे अध्यक्ष नितीन झंवर, एस.आर.मणियार व अजय जैन.जळगाव- सी.ए. शाखा तसेच जिल्हा टॅक्स प्रॅक्टीशन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आय.सी.ए.आय. भवन, गजानन कॉलनी, रिंगरोड येथे सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेदरम्यान बजेट -२०१६ वर चर्चासत्र झाले.जळगावचे वरिष्ठ सी.ए.सदस्य सी.ए.अनिलकुमार शाह व सी.ए. एस.आर.मणियार हे तज्ज्ञ अर्थसंकल्पातील बारकावे सदस्यांना समजावण्याकरीता उपस्थित होते. त्यांच्यामते आजचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे कृषीप्रधान असा होता. त्यात शेतकर्यांना विशेष असे महत्व देऊन त्यांच्या पुरेपुर मदतीसाठी विमा योजना तसेच खताच्या सबसीडीचे रक्कम सरळ बँक खात्यात जमा करण्यासाठी बरेच महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. म्हणजेच एकंदरीत हा संकल्प सरासरी राहिला,असे मत उपस्थित सदस्यांनी मांडले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन जळगाव सी.ए.शाखेेचे सचिव अजय जैन यांनी केेले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव सी.ए.शाखेचे अध्यक्ष नितीन झंवर, उपाध्यक्ष पल्लवी मयूर तसेच सी.ए. कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.