जळगावचा पारा ८ सेल्सीअस अंशावर रुग्णसंख्या वाढली : केळी व कांद्याला फटका तर गहू, हरभर्याला लाभदायक
By admin | Published: January 22, 2016 12:09 AM2016-01-22T00:09:47+5:302016-01-22T00:09:47+5:30
जळगाव : उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने राज्यभरात थंडीचा कडाका पुन्हा जाणवायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी जळगावचा पारा ८ सेल्सीअस अंशावर येऊन पोहचला. मकरसंक्रातीनंतर परतलेल्या थंडीमुळे केळी व कांद्याच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तर गहू व हरभर्याला मात्र लाभदायक ठरणार आहे. बदलणार्या वातारणामुळे सर्दी व तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे.
Next
ज गाव : उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने राज्यभरात थंडीचा कडाका पुन्हा जाणवायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी जळगावचा पारा ८ सेल्सीअस अंशावर येऊन पोहचला. मकरसंक्रातीनंतर परतलेल्या थंडीमुळे केळी व कांद्याच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तर गहू व हरभर्याला मात्र लाभदायक ठरणार आहे. बदलणार्या वातारणामुळे सर्दी व तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणारे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेर गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. आठ दिवसात पाच सेल्सीअसने पारा घसलाडिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत थंडीचा जोर कायम होता. त्यानंतर जानेवारीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत उन्हाचे चटके जाणवू लागले. मकरसंक्रांतीनंतर थंडी कमी होऊन उन्हाचा तडाका जाणवायला सुरुवात होते. मात्र १६ तारखेपासून उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या दरम्यान तापमाचा पारा किमान पाच सेल्सीअस अंशानी घसरला आहे.वातावरण बदलामुळे रुग्णसंख्या वाढलीजानेवारीच्या पंधरवड्यात उष्ण आणि त्यापाठोपाठ थंड हवामानामुळे सर्दी व तापाच्या रुग्णात वाढ झाली आहे. फ्ल्यू, मलेरिया तसेच हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने जिल्हा रुग्णालयासह शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. वातावरण बदलामुळे घश्याच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील ओपीडीमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे.केळी व कांद्याच्या पिकाला फटकाया थंडीचा केळी आणि कांद्याच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बुरशीजन्य रोगासाठी हे वातावरण लाभदायक असल्याने केळीवर करपा व सरका या रोगाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे. तर कांद्यावरदेखील करपा रोगाचा प्रार्दुभाव असण्याची शक्यता आहे. करपा व सरका या रोगांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्यांनी बुरशीनाशकाची फवारणी करावी असे तज्ज्ञांनी सुचविले आहे. वाढत्या थंडीचा गहू व हरभर्यासह कोरडवाहू पिकांना मात्र चांगला लाभ होणार आहे. यावर्षी जिल्ात अत्यल्प पाऊस झाल्याने गव्हाचे क्षेत्र केवळ २० हजार हेक्टरवर आहे. थंडीमुळे जमिन ओलसर राहणार असल्याने त्याचा लाभ गव्हाला होणार आहे. यासह रब्बी ज्वारीलादेखील याचा लाभ होण्याची शक्यता आहे.जळगाव जिल्ातील तापमानजळगाव८भुसावळ८अमळनेर११बोदवड११भडगाव११चोपडा८चाळीसगाव९धरणगाव११एरंडोल१०फैजपूर१२जामनेर८मुक्ताईनगर१२पारोळा१२पाचोरा११रावेर १२सावदा १२वरणगाव१२यावल ८