जळगावकर होणार विश्वविक्रमाचे दावेदार! जलबचतीचा संदेश : ७ एकरात साकारली महाकाय रांगोळी
By admin | Published: April 10, 2016 10:37 PM2016-04-10T22:37:54+5:302016-04-10T22:37:54+5:30
जळगाव : जलबचतीचा संदेश देण्यासाठी जळगावकरांनी रविवारी राष्ट्रीय महामार्गावरील खेडी शिवारातील दूरदर्शन टॉवरजवळ ७ एकर क्षेत्रात मनोवेधक महाकाय रांगोळी साकारली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी या उपक्रमाचे नामांकन दाखल करण्यात येणार असून लवकरच जळगावकर विश्वविक्रमाचे दावेदार होणार आहेत.
Next
ज गाव : जलबचतीचा संदेश देण्यासाठी जळगावकरांनी रविवारी राष्ट्रीय महामार्गावरील खेडी शिवारातील दूरदर्शन टॉवरजवळ ७ एकर क्षेत्रात मनोवेधक महाकाय रांगोळी साकारली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी या उपक्रमाचे नामांकन दाखल करण्यात येणार असून लवकरच जळगावकर विश्वविक्रमाचे दावेदार होणार आहेत.सर्वात जलद साकारलेली व मोठी रांगोळीजमिनीवरून डोळ्यांमध्ये न सामवणारी तब्बल ७ एकर क्षेत्रातील महाकाय रांगोळी साकारून जळगावकरांनी संपूर्ण विश्वाला जलबचतीचा संदेश दिला आहे. जगातील आतापर्यंतची सर्वात जलद साकारलेली व मोठी रांगोळी असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यापूर्वीचा विश्वविक्रम हा साडेसहा एकर आकाराच्या रांगोळीचा होता. तिला साकारण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागला होता. मात्र, शासनाचा जलसंपदा विभाग, नीर फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टीम्स् यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या महाकाय रांगोळीसाठी केवळ ४० मिनिटांचा कालावधी लागल्याने हा नवा विश्वविक्रम झाला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे नामांकन गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.पर्यावरणपूरक रंगांचा वापररांगोळी साकारण्यासाठी ६५ टन रांगोळी लागली. त्यात भरण्यात आलेले निरनिराळे रंग हे पर्यावरणपूरक आहेत. ही विलोभनीय व मनोवेधक रांगोळी नागरिकांसाठी मंगळवारपर्यंत उपलब्ध राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.