जलिकट्टू : पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मरीना बीचवरून हटवले

By admin | Published: January 23, 2017 09:48 AM2017-01-23T09:48:01+5:302017-01-23T11:50:18+5:30

जलिकट्टू खेळावरील बंदी कायमस्वरूपी हटवण्यात यावी या मागणीसाठी गेल्या आठवड्याभरापासून मरीना बीचवर आंदोलन करणा-यांवर पोलिसांनी सोमवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला.

Jaliktu: Police have removed agitators from Marina Beach | जलिकट्टू : पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मरीना बीचवरून हटवले

जलिकट्टू : पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मरीना बीचवरून हटवले

Next
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २३ -  जलिकट्टू  या पारंपरिक खेळावरील बंदी हटवण्यात यावी या मागणीसाठी गेल्या आठवड्याभरापासून मरीना बीचवर आंदोलन करणा-यांवर पोलिसांनी सोमवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला. ' तुमची मागणी आता मान्य झाली आहे, त्यामुळे आता हा परिसर रिकामा करा' असे आदेश पोलिसांनी आंदोलकांना दिवे. मात्र आंदोलकांनी जागेवरून हटण्यास नकार देत पोलिसांनी कारवाई केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने बीचवरील परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना हटवण्यास सुरुवात केली आहे.
जलिकट्टूवर घातलेली बंदी तात्पुरत्या स्वरुपात उठवल्यानंतरही तामिळी जनतेचा असंतोष शांत झालेला नाही. अध्यादेश काढूनही जलिकट्टूचा तिढा कायम आहे. या खेळावरील बंदीसदंर्भात कायमस्वरूपी तोडगा काढावा तसेच 'पेटा' या प्राणीप्रेमी संघटनेवर बंदी घालावी या मागणीसाठी मरिना बीचवर गेल्या आठवड्याभरापासून आंदोलन सुरू आहे. मरिना बीचवरील हजारो आंदोलकांनी बीच परिसर खाली करावी अशी विनंती पोलिसांनी केली. मात्र रण्याची आंदोलकांनी ही विनंती धूडकावून लावत कारवाई केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला. त्यानंतर  बीच परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आणि त्यांनी आंदोलकांना हटवण्यास सुरुवात केली. 

Web Title: Jaliktu: Police have removed agitators from Marina Beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.