जल्लीकट्टू - न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर

By admin | Published: January 18, 2017 05:11 PM2017-01-18T17:11:44+5:302017-01-18T17:20:09+5:30

न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आज चेन्नईच हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये विद्यार्थी आणि तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Jallikattu - Thousands of people on the streets against the court's verdict | जल्लीकट्टू - न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर

जल्लीकट्टू - न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर

Next

ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. 18 : तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या पोंगल सणाच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या जल्लीकट्टू या पारंपरिक खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आज चेन्नईच हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये विद्यार्थी आणि तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. चेन्नईमधील प्रसिद्ध मरिना समुद्रकिनानाऱ्यावर काल (मंगळवार) रात्रीपासून हजारो आंदोलक जल्लिकट्टु व्हायलाच हवा, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे. 
 
पेटा व इतर प्राणीवादी संघटनांनी जल्लिकट्टुस परवानगी दिली जाऊ नये, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने यास मान्यता दर्शविल्याने मिळनाडूमधील हजारो संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
 

Web Title: Jallikattu - Thousands of people on the streets against the court's verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.