सावधान... ती म्हणाली, मला जीव द्यावासा वाटतोय; अन् मोमो चॅलेंजसाठी मेसेज आला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:09 AM2018-08-23T11:09:49+5:302018-08-23T11:20:29+5:30
ब्लू व्हेल गेम आणि किकी चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ जोरदार व्हायरल होत आहे.
कोलकाता- ब्लू व्हेल गेम आणि किकी चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ जोरदार व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा धोकादायक गेम सर्वत्र पसरत आहे. या गेमवरून आता पश्चिम बंगालमध्ये एक तक्रार दाखल झाली आहे. पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमधील एका कॉलेज विद्यार्थिनीनं मोमो चॅलेंज प्रकरणात तक्रार नोंदवली आहे. त्या विद्यार्थिनीच्या मते, एका अज्ञातानं तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून मोमो चॅलेंज गेम खेळण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्या विद्यार्थिनीनं तक्रारी म्हटलं आहे की, स्वतःच्या आईबरोबर झालेल्या भांडणानंतर त्या विद्यार्थिनीनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली.
त्या पोस्टमध्ये तिनं आईशी भांडण झाल्यानं जीव द्यावासा वाटतोय, असं लिहिलं होतं. माझी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर थोड्याच वेळानं माझ्या मोबाइलवर एका अज्ञात व्हॉट्सअॅप नंबरवरून मेसेज आला, ज्यात मला मोमो चॅलेंज गेम खेळण्याचं आवाहन दिलं होतं. जेव्हा तिनं मेसेज पाठवणा-याला त्यांची ओळख विचारली, तेव्हा त्यानं जुजबी उत्तर दिलं. घाबरलेल्या त्या तरुणीनं संपूर्ण घडलेला प्रकार स्वतःच्या मोठ्या भावाला सांगितला. भावानंही त्या गेममध्ये सहभागी न होण्यास सांगितलं. पीडित विद्यार्थिनीनं घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू आहे.
सावधान! ब्लू व्हेल आणि किकी चॅलेंजपेक्षा धोकादायक आहे 'हा' खेळ
Momo Challenge : मोमो चॅलेंजचा भारतात पहिला बळी?, गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या
ब्लू वेल चॅलेंजनंतर आता इंटरनेटवर मोमो चॅलेंज गेम व्हायरल होत आहे. अनेक देशातील तरुण आणि लहान मुलं मोमो चॅलेंज गेमचा शिकार होत आहेत. तर मोमो चॅलेंजमुळे भारतातील पहिला बळी गेल्याचे वृत्त समोर आले होतं. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील अजमेर येथे इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी आत्महत्येमागील कारण मोमो चॅलेंज असल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. मोमो चॅलेंजच्या माध्यमातून धमकी मिळल्यानंतर युजर घाबरतो आणि ते चॅलेंज पूर्ण करण्यास तयार होतो. गेम खेळताना अनेक जण नैराश्यात जातात. तसेच पुढे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. हा जीवघेणा खेळ लहान मुलांना आणि तरुणांना प्रामुख्याने टार्गेट करतो.
असं आहे मोमो चॅलेंज
- सर्वप्रथम यूजरला एक अनोळखी नंबर मिळतो. तो मोबाईलमध्ये सेव्ह केल्यानंतर Hi-Hello करण्याचं चॅलेंज दिलं जातं.
- अनोळखी नंबरवर त्यानंतर युजरला बोलण्याचे चॅलेंज दिले जाते.
- या नंबरवरून पुढे युजर्सला चित्रविचित्र घाबरवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप पाठवल्या जातात.
- मोमो चॅलेंजमध्ये पुढे युजर्सना काही टास्क दिले जातात. ते पूर्ण केले नाहीत तर त्यांना धमकावलं जातं.
- धमक्यांना घाबरल्यामुळे युजर्स पुढे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात.