Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 09:07 AM2022-06-07T09:07:13+5:302022-06-07T09:14:04+5:30
Jammu And Kashmir : लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने पहाटे कंदीमध्ये शोधमोहीम सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिलं.
श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. याच दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश आलं आहे. कुपवाडामध्ये (Kupwada) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चकतारस कंदी परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केलं. एका दशहतवाद्याचे नाव तुफैल असून तो पाकिस्तानमधील रहिवाशी आहे. तर, ठार करण्यात आलेले दोन दहशतवादी लष्कर ए तोयबासाठी काम करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने पहाटे कंदीमध्ये शोधमोहीम सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिलं. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी याबाबत माहिती दिली. लष्करचे दोन दहशतवादी चकमकीत ठार झाले. गेल्या 12 तासांतील ही दुसरी चकमक आहे. याआधी सोमवारी संध्याकाळी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा सुरक्षा दलांनी खात्मा केला होता.
#KupwaraEncounterUpdate: Two terrorists of proscribed terror outfit LeT including one Pakistani terrorist namely Tufail killed. Search still going on: IGP Kashmir Vijay Kumar pic.twitter.com/yUGW1ngiCO
— ANI (@ANI) June 7, 2022
अंधाराचा फायदा घेत दोन पाकिस्तानी आणि एक स्थानिक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एक एके 47 रायफल, पाच मॅगझिन आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार त्याची ओळख हंजला, पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.