Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू काश्मीरमध्ये 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; 'हिजबुल'चा टॉप कमांडर ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 09:21 AM2021-07-08T09:21:04+5:302021-07-08T09:29:53+5:30
Jammu And Kashmir And Terrorists : गेल्या 24 तासांत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने केलेली ही मोठा कामगिरी आहे.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश मिळालं आहे. गेल्या 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये 'हिजबुल'चा टॉप कमांडर देखील ठार झाला आहे. पुलवामा आणि कुलगाम चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. त्यासोबतच घाटीमध्ये गेल्या 24 तासांत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने केलेली ही मोठी कामगिरी आहे. काश्मीर पोलीस आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत 5 दहशतवादी ठार झाले आहे. यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलाचं त्यांनी अभिनंदन केलं आहे. पुलवामाच्या परिसरात बुधवारी रात्री चकमक सुरू झाली होती.
काही दहशतवादी परिसरात लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या परिसराला घेराव घालण्यात आला होता. त्याच दरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्य़ाशिवाय कुलगामच्या जोदार परिसरात पोलीस आणि 01 आरआर यांचं एक जॉईंट ऑपरेशन झालं. त्यामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. काही ठिकाणी अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे. सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद (Mehrazuddin Halwai) याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ जवानांनी एका संयुक्त मोहिमेत या दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.
5 terrorists killed in 24 hours in Kashmir. Congratulations to police & security forces for conducting ops without collateral damage: IGP Kashmir Vijay Kumar
— ANI (@ANI) July 8, 2021
काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिद्दीनचा सर्वात जुना, अनुभवी आणि टॉप कमांडर्सपैंकी एक असलेल्या मेहराजुद्दीन हलवाई याचा खात्मा करण्यात आला आहे, तो अनेक मोठ्या कटामध्ये सहभागी होता. त्यामुळेच हे खूप मोठं यश आलं. मंगळवारी रात्री उशिरा हंदवाडाच्या क्रालगुंडच्या पाजीपोरा-रेनान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक घडून आली. मिळालेल्या माहितीनुसार, सेनेच्या 32 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफची 92 बटालियनची एक संयुक्त टीम या भागातील मोहिमेत सहभागी झाली होती. दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून हे ऑपरेशन हाती घेण्यात आलं होतं. उत्तर काश्मीरच्या हंदवाडा भागात झालेल्या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाच्या हाती मोठं यश आलं.
Jammu And Kashmir : हिजबुल मुजाहिद्दीनच्या सर्वात जुन्या, अनुभवी दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश#JammuAndKashmir#Terrorist#terrorismhttps://t.co/CPEKWByPkc
— Lokmat (@MiLOKMAT) July 7, 2021
मोठं यश! 'हिजबुल'चा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाईचा खात्मा
मेहराजुद्दीन याचा खोऱ्यात अशांतता पसरवण्यात तसंच अनेक दहशतवादी कारवायात थेट सहभाग होता. तसेच परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. काश्मीरमध्ये दहशतवादाचाच खात्मा करण्यासाछी सुरक्षा दलाच्या वतीने सातत्याने ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता सुरक्षा दलांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. हायब्रीड दहशतवाद्यांच्या रुपात सुरक्षा दलांचे जवान श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात अडचणींचा सामना करत आहेत. दहशतवादी कारवाया घडवल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगणारे दहशतवादी सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.