Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुलगाम, अनंतनाग चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 09:17 AM2021-12-30T09:17:36+5:302021-12-30T09:27:06+5:30

Jammu And Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे.

Jammu And Kashmir 6 terrorists killed in encounter with security forces in kulgam and anantnag in kashmir | Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुलगाम, अनंतनाग चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुलगाम, अनंतनाग चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा

Next

नवी दिल्ली - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. याच दरम्यान सैन्याला मोठं यश मिळालं आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. यासंदर्भातील माहिती स्थानिक पोलीस प्रशासनानेच दिली आहे.

दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.  दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. ही कारवाई सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठं यश आहे.

बुधवारी सायंकाळी दक्षिण काश्मीरमधील दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या कारवाया सुरू करण्यात आल्या होत्या. काश्मीर पोलिसांनीही ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली. सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यापैकी चौघांची ओळख पटली आहे. यातील दोघे पाकिस्तानी असून इतर दोघे स्थानिक आहेत. इतर दोन दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

अनंतनागमधील नवगाम परिसरामध्ये झालेल्या चकमकीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या कर्मचाऱ्याला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अनंतनागमधील चकमकीनंतर कुलगाम जिल्ह्यामधील मिरहामा गावामध्ये चकमक सुरू झाली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तपास सुरू असतानाच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे.

 

Web Title: Jammu And Kashmir 6 terrorists killed in encounter with security forces in kulgam and anantnag in kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.