जम्मू-काश्मिरात 71 टक्के तर झारखंडमध्ये 62 टक्के मतदान
By Admin | Published: November 26, 2014 01:38 AM2014-11-26T01:38:59+5:302014-11-26T01:38:59+5:30
जम्मू-काश्मिरात 87 पैकी 15 जागांसाठी 71 टक्के तर झारखंडमध्ये 81 पैकी 13 जागांसाठी 61़92 टक्के मतदान झाल़े
श्रीनगर/रांची : जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभेच्या पाच टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्याचे मतदान मंगळवारी उत्साहात पार पडल़े जम्मू-काश्मिरात 87 पैकी 15 जागांसाठी 71 टक्के तर झारखंडमध्ये 81 पैकी 13 जागांसाठी 61़92 टक्के मतदान झाल़े झारखंडमध्ये मतदान यंत्रची हानी करण्याच्या किरकोळ घटना वगळता दोन्ही राज्यांत शांततेत मतदान पार पडल़े
जम्मू-काश्मीरच्या पंधराही मतदार संघात फुटिरवादी संघटनांचा बहिष्कार आणि गोठवून टाकणारी थंडी याची तमा न बाळगता मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या़ अनेक ठिकाणी मतदारांनी आपण दहशतवादाच्या विरोधात हा हक्क बजावल्याचे आवजरून सांगितले.
पहिल्या टप्प्यात झारखंडमध्ये झालेल्या मतदानादरम्यान छत्तरपूर मतदारसंघातील दोन मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे नुकसान करण्याच्या किरकोळ घटना घडल्या़ या दोन्ही ठिकाणचे मतदान रद्द करण्यात आले आह़े उर्वरित भागात शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडल़े