Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 11:48 AM2020-04-05T11:48:53+5:302020-04-05T11:52:03+5:30
Jammu And Kashmir : कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
श्रीनगर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी वारंवार प्रशासनाकडून आवाहन देखील करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरामध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. त्यानंतर आता भारतीय सैन्याला काश्मीरमधील विविध भागांमध्ये केलेल्या कारवाईत 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.
गेल्या 24 तासांत सैन्याने हे मोठं यश मिळवले आहे. मात्र या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एएनआय या वृत्तसंस्थने याबाबत माहिती दिली आहे. केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर दक्षिण काश्मिरमधील बाटपुरा येथे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. अशा एकूण 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
In this operation, 1 Indian Army soldier has been lost his life while 2 more are critically injured. Operations to evacuate the injured have been hampered by heavy snow and rough terrain conditions. Operation is still in progress: Army sources https://t.co/BKPo6NiVv9
— ANI (@ANI) April 5, 2020
शनिवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याला भारतीय सुरक्षारक्षकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये सुंदरबन परिसरात शुक्रवारी ( 3 एप्रिल ) सीमारेषेचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता. भारतीय सैन्याकडून या हल्ल्याला चौख प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र राजौरी येथील झालेल्या चकमकीत 6 जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ...म्हणून 'पबजी' 24 तास राहणार बंद
Coronavirus : धक्कादायक! ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास