Jammu and Kashmir: पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार; अमित शहांचा लोकसभेत निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 11:37 AM2019-08-06T11:37:40+5:302019-08-06T11:46:12+5:30
राज्यसभेत मोदी सरकारनं कलम 370 रद्द करण्याच्या शिफारशीला मंजुरी मिळवल्यानंतर आज ते लोकसभेत सादर करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली- राज्यसभेत मोदी सरकारनं कलम 370 रद्द करण्याच्या शिफारशीला मंजुरी मिळवल्यानंतर आज ते लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. त्यानंतर या विधेयकावर लोकसभेत जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनी अमित शाहांना या विधेयकावरून घेरलं असतानाच अमित शहांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. लोकसभेत अमित शाह आणि काँग्रेस नेते अधीर रंजन यांच्यात वाक्युद्ध रंगलं आहे.
अमित शाहा म्हणाले, काँग्रेसनं हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात असल्याचं सांगितलं आहे आणि त्यांची परवानगी घेतल्याशिवाय आम्ही हे विधेयक घेऊन आलो आहोत. काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करावी, असंही अमित शहा म्हणाले. अधीर रंजन यांनी उत्तरादाखल सांगितलं की, 1948पासून जम्मू-काश्मीर हा विषय संयुक्त राष्ट्राच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे हे अंतर्गत प्रकरण कसं होईल. आपण शिमला करार केला, लाहोरला बसची घोषणा केली, त्यामुळे ही सर्व अंतर्गत प्रकरणं होती की द्विपक्षीय करार हे अमित शाहांनी मला सांगावं. त्यानंतर अमित शाहांनीही त्याला उत्तर दिलं.
जेव्हा मी जम्मू-काश्मीर राज्य असा उल्लेख करतो, त्यात पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनही येतं. काश्मीरबाबत निर्णय घेण्याचा संसदेला अधिकार आहे. त्यासाठी कुणाचीही संमती घ्यायची गरज नाही. संसद हे सर्वोच्च सभागृह आहे, असंही अमित शाह म्हणाले आहेत. तसेच पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं.Adhir Ranjan Chowdhury, Congress, in Lok Sabha: You say that it is an internal matter. But it is being monitored since 1948 by the UN, is that an internal matter? We signed Shimla Agreement & Lahore Declaration, what that an internal matter or bilateral? pic.twitter.com/UPLd8BgwS6
— ANI (@ANI) August 6, 2019
Home Minister Amit Shah in Lok Sabha: Parliament has the right to make laws on Jammu & Kashmir. https://t.co/SQmM5ZJqGs
— ANI (@ANI) August 6, 2019
Union Home Minister Amit Shah, in Lok Sabha: Main sadan mein jab jab Jammu and Kashmir rajya bola hoon tab tab Pakistan occupied Kashmir aur Aksai Chin dono iska hissa hain, ye baat hai. pic.twitter.com/Juft5KViMw
— ANI (@ANI) August 6, 2019