Jammu And Kashmir : कुलगामच्या २ गावात चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 08:38 AM2024-07-07T08:38:58+5:302024-07-07T08:47:25+5:30

Jammu And Kashmir : कुलगाम जिल्ह्यातील चिनिगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Jammu And Kashmir anti terror operation underway in kulgam district south kashmir | Jammu And Kashmir : कुलगामच्या २ गावात चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान शहीद

Jammu And Kashmir : कुलगामच्या २ गावात चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान शहीद

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिनिगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मोदरगाम गावात सर्च ऑपरेशन सुरू आहे. याच दरम्यान झालेल्या गोळीबारात लान्स नाईक प्रदीप नैन (पॅरा कमांडो) शहीद झाले. तसेच फ्रिसल कुलगाममधील दुसऱ्या चकमकीत 01 RR चे हवालदार राज कुमार देखील शहीद झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराची पहिली कारवाई सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांनी चिनीगाम गावात गोळीबाराची दुसरी घटना घडली. लष्कराला गुप्त माहिती मिळाली, त्यानंतर सुरक्षा दल त्या भागात पोहोचलं आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला आहे. कुलगाम परिसरात दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. यावेळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शनिवारी जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ आणि उधमपूर जिल्ह्यांमध्ये एका सहाय्यक उपनिरीक्षकासह सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान रस्ते अपघातात शहीद झाले. वाहन रस्त्यावरून घसरले आणि कठुआ जिल्ह्यातील राजबागजवळील उझ कालव्यात पडले. या अपघातात हिमाचल प्रदेशचे रहिवासी एएसआय परषोतम सिंह हे शहीद झाले, तर त्यांचे दोन सहकारी बचावले. जसरोटा येथून राजबागकडे जात असताना परषोतम कार चालवत होते. त्याचवेळी त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव कर्मचाऱ्यांना बीएसएफच्या दोन जवानांचा जीव वाचविण्यात यश आलं, परंतु परषोतम सिंह हे प्रवाहामुळे वाहून गेले आणि नंतर ते गंभीर अवस्थेत सापडले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या अपघातात बीएसएफ जवान अमित कुमार शुक्ला (३०) यांची कॅब उधमपूर जिल्ह्यातील चेनानी-नाशरी बोगद्याच्या आत उलटल्याने त्यांना जीव गमवावा लागला. अमित शुक्ला हे जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ते झारखंड येथील त्यांच्या घरी जात होते.
 

Web Title: Jammu And Kashmir anti terror operation underway in kulgam district south kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.