काश्मीर खोऱ्यात 'सुगंध' नव्हे, स्फोट घडवेल हे नवे शस्त्र; दहशतवाद्यांनी बनवला 'परफ्युम' बॉम्ब!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 02:42 PM2023-02-02T14:42:49+5:302023-02-02T14:44:35+5:30
पाकिस्तान नेहमीच दहशतवाद पसरवणाऱ्यांना आसरा देण्यासाठी आणि जगभरात शेकडो निष्पाप लोकांच्या हत्येला कारणीभूत आहे याची कल्पना तर जगाला आहेच.
नवी दिल्ली-
पाकिस्तान नेहमीच दहशतवाद पसरवणाऱ्यांना आसरा देण्यासाठी आणि जगभरात शेकडो निष्पाप लोकांच्या हत्येला कारणीभूत आहे याची कल्पना तर जगाला आहेच. जम्मू-काश्मीर नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलं आहे. पाकिस्तानला जम्मू-काश्मीरमधील लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करायची आहे, असे जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांचे म्हणणे आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
"२१ जानेवारीला जम्मूच्या नरवालमध्ये २ आयईडी स्फोट झाले. या घटनेप्रकरणी आरिफ नावाच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून तो रियासी येथील रहिवासी आहे. तो गेल्या ३ वर्षांपासून सीमेपलीकडील लष्कर-ए-तैयबाच्या हस्तकांशी संपर्कात होता", अशी माहिती दिलबाग सिंग यांनी दिली.
Visuals of perfume IED which was recovered from the terrorist, Arif.
— ANI (@ANI) February 2, 2023
This is the first time any perfume IED has been recovered by Jammu Police. pic.twitter.com/COynZ9mMsD
"फेब्रुवारी २०२२ मध्ये शास्त्रीनगरमध्ये IED स्फोट झाला होता. त्या स्फोटामागे आरिफचा हात होता. कटरा येथे झालेल्या स्फोटानंतर बसला आग लागली, आरिफने बसमध्ये आयईडी ठेवल्याचे मान्य केले आहे. त्याच्याकडून एक आयईडीही जप्त करण्यात आला आहे. राजौरी पोलिसांनी परिसरात दहशतवादाचा प्रयत्न हाणून पाडला", अशीही माहिती सिंग यांनी दिली.
This is the first time we have recovered a perfume IED. We have not recovered any perfume IED before. The IED will blast if anyone tries to press or open it. Our special team will handle that IED: Jammu and Kashmir DGP Dilbag Singh pic.twitter.com/bNerYGDcVa
— ANI (@ANI) February 2, 2023
परफ्यूम बॉम्ब हस्तगत
'अटक करण्यात आलेला आरिफ त्याच्या हस्तकांच्या संपर्कात होता. त्याच्या आजोबांचे घर पाकिस्तानात आहे. कासिम हा त्याचा दुसरा सहकारी असून तो शास्त्रीनगर स्फोटात आयईडीसाठी जबाबदार आहे. कटरा येथे जाणाऱ्या बसमध्ये त्याने आयईडी बसवला. त्याच्याकडे आणखी एक आयईडी होता जो परफ्यूम आयईडी आहे. त्याच्याकडून परफ्यूम आयईडी जप्त करण्यात आला आहे", अशी माहिती दिलबाग सिंग यांनी दिली.