Jammu Kashmir: पुलवामामध्ये सुरक्षा दलाकडून जैशच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, शोध मोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 09:15 AM2021-08-21T09:15:15+5:302021-08-21T09:15:43+5:30
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शनिवारी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शनिवारी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यात आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. तिन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याचं समोर आलं आहे. (Jammu and Kashmir: Encounter in Awantipora of Pulwama district, security forces surrounded the area, terrorists are hiding in the forest)
Three unidentified terrorists affiliated with proscribed terror outfit JeM killed. Search operation underway, further details awaited: Jammu a& Kashmir Police
— ANI (@ANI) August 21, 2021
दक्षिण काश्मीरमध्ये नागबेरान त्रालच्या वन क्षेत्रात घाट परिसरात दहशतवाद्यांचा वावर असल्याचं माहिती मिळताच सुरक्षा दलानं याठिकाणी शोध मोहीम सुरू केली होती. याच दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि चकमकीला सुरुवात झाली. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर अजूनही शोध मोहीम सुरू आहे, अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.