Jammu And Kashmir : बारामुला चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 08:44 AM2019-08-21T08:44:59+5:302019-08-21T09:07:28+5:30
जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (20 ऑगस्ट) चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक जवान शहीद झाला असून एक जण जखमी झाला आहे. जखमी जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्याने शोधमोहीम सुरू होती. घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये बारामुलामध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
#UPDATE Baramulla encounter: One Special Police Officer (SPO) lost his life in the encounter, one terrorist has been gunned down. The encounter has concluded. #JammuAndKashmirhttps://t.co/SzhyNCvob1
— ANI (@ANI) August 21, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, चकमकी दरम्यान एसपीओ बिलाल हे शहीद झाले आहेत तर एसआय अमरदीप परिहार हे जखमी झाले आहेत. अमरदीप यांना उपचारासाठी आर्मी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जम्मू - काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय रंग देण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर पाकिस्ताने नियंत्रण रेषेवरील कुरबुरी वाढवण्यात सुरुवात केली आहे. दरम्यान, जम्मूमधील कृष्णाघाटी परिसरात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. दरम्यान, भारतीय लष्करानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Jammu and Kashmir: A jawan of the Indian Army lost his life in ceasefire violation by Pakistan Army, in KRISHNA GHATI sector today. pic.twitter.com/2FHelCAiOo
— ANI (@ANI) August 20, 2019
भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांमध्ये नाचक्की झाल्याने आता पाकिस्तानने आपला मोर्चा काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याकडे वळवला आहे. मंगळवारी नियंत्रण रेषेजवळी कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. शहीद जवानाचे नाव नाईक रवी राजन कुमार सिंह असल्याचे समोर आले आहे. तसेच पाकिस्तानच्या या गोळीबारामुळे चार जण जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या आगळीकीमुळे नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने स्थानिक रहिवाशांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत.