सोपोरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सुरक्षा जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 08:00 AM2019-02-22T08:00:30+5:302019-02-22T10:06:35+5:30
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी अभियान सुरू केलं आहे
श्रीनगर- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी अभियान सुरू केलं आहे. उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली, लष्करी जवानांनी त्या भागात सर्च ऑपरेशन राबवलं असून, दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे.
जवळपास दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असून, ते सुरक्षा जवानांवर गोळीबार करत आहेत. काश्मीर खोऱ्यात 60 दहशतवादी सक्रिय आहेत, ज्यातील 35 पाकिस्तानी दहशतवादी आहेत. या दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा जवानांनी अभियान छेडलं असून, या अभियानाला ऑपरेशन 60 असं नाव देण्यात आलं आहे. तत्पूर्वी लष्करानं ऑपरेशन 25 चालवलं होतं.
त्याअंतर्गतही सुरक्षा जवानांनी दहशतवादी गाझी राशीदला ठार केलं होतं. त्याआधी शोपियानमध्ये संशयास्पद हालचाली आढळल्या होत्या. LOCवर पाकिस्ताननं गोळीबारही वाढवला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी तपास अभियान सुरू केलं आहे.