जम्मू काश्मीर : अवंतीपोरामध्ये चकमकीदरम्यान 6 दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 09:48 AM2018-12-22T09:48:31+5:302018-12-22T13:27:39+5:30
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील त्राल येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील त्राल येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. आताही परिसरात चकमक सुरू असल्याची माहिती आहे. संपूर्ण परिसराला जवानांनी घेराव घालत येथे शोधमोहीम सुरू केली आहे.
ठार करण्यात आलेले दहशतवादी कोणत्या संघटनेचे होते, याची माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेली नाही. दरम्यान, अवंतीपोरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली. त्रालमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई राबवली.
यादरम्यान, सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. चकमकीनंतर घटनास्थळावरुन दारूगोळादेखील जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीमध्ये झाकिर मुसाचा अतिशय जवळचा मानला जाणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यातही पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
J&K Police: Killed terrorists identified as Soliha Akhoon,resident of Arampora Tral, Faisal resident of Amlar, Nadeem Sofi,resident of Batagund Tral, Rasiq Mir,resident of Dadsara Tral, Rouf and Umar both residents of Dadsara Tral. This group was part of Zakir Moosa faction https://t.co/7qn0V6nGSH
— ANI (@ANI) December 22, 2018
SP Pani, IG Kashmir on Pulwama encounter: 6 terrorists were killed in the operation, there was no collateral damage. Identities and affiliation of terrorists being ascertained. We thank civilians for cooperating with us, it was a clean operation. pic.twitter.com/luSSREueEr
— ANI (@ANI) December 22, 2018
#UPDATE Jammu and Kashmir: Six terrorists killed in the ongoing encounter in Tral, Pulwama. Arms and ammunition recovered. Operation over. pic.twitter.com/FVwNhS85Q5
— ANI (@ANI) December 22, 2018
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातील केरन क्षेत्रात नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन पाकिस्तानी सैन्यानं शुक्रवारी केलेल्य गोळीबारात दोन भारतीय लष्करी अधिकारी शहीद झाले. या घटनेत ज्युनिअर कमिशण्ड ऑफिसर (जेसीओ) शहीद झाले, तर गंभीर जखमी झालेल्या आणखी एक अधिकाऱ्यानं रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला.
पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
Jammu and Kashmir: Encounter underway between terrorists & security forces in Tral, Pulwama. More details awaited. pic.twitter.com/z3IJ7mnAVR
— ANI (@ANI) December 22, 2018