Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरच्या सलाथिया चौकात भीषण स्फोट; एकाचा मृत्यू; 15 जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 04:31 PM2022-03-09T16:31:38+5:302022-03-09T16:32:15+5:30

Jammu And Kashmir : स्फोटाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, लष्कराचे अधिकारी आणि जवानही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.

Jammu And Kashmir explosion at salathia chowk in udhampur one killed 15 civilians injured | Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरच्या सलाथिया चौकात भीषण स्फोट; एकाचा मृत्यू; 15 जण गंभीर जखमी

Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरच्या सलाथिया चौकात भीषण स्फोट; एकाचा मृत्यू; 15 जण गंभीर जखमी

Next

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) उधमपूर (Udhampur city) शहरातील सलाथिया चौकात एक संशयास्पद स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, लष्कराचे अधिकारी आणि जवानही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी उधमपूरमधील सलाथिया चौकात संशयास्पद स्फोट झाला. भाजीच्या स्टॉलजवळ हा स्फोट झाला असून तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. स्फोटात अन्य 15 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना उपचारासाठी उधमपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जवानही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

पीएमओमधील मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनीही घटनेची माहिती घेतली आहे. उधमपूर तहसीलदार कार्यालयाजवळ हा स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांनी डीसीशी संवाद साधला, तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले. याच बरोबर पोलीस पथक घटने मागच्या नेमक्या कारणाचा तपास करत आहे. याआधी 6 मार्चलाही श्रीनगरच्या अमीराकदल भागातील बाजारात स्फोट झाला होता. दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. त्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर 23 जण जखमी झाले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Jammu And Kashmir explosion at salathia chowk in udhampur one killed 15 civilians injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.