40 किलो स्फोटकं, संरक्षणदलावर निशाणा; आयजींनी सांगितला पुलवामामध्ये असा होता दहशतवाद्यांचा 'प्लॅन'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 01:55 PM2020-05-28T13:55:21+5:302020-05-28T14:30:50+5:30
गेल्या वर्षीही पुलवामामध्ये अशाच पद्धतीचा कट आखून दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात CRPF च्या जवळपास 45 जवानांना हौतात्म्य आले होते.
पुलवामा : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये संरक्षण दलाच्या जवानांनी आज (गुरुवार) दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. येथे एका गाडीत मोठ्या प्रमाणावर IED होते. संरक्षण दलाच्या जवानांनी ते ट्रॅक करून डिफ्यूज केले. यावर, संरक्षण दलाच्या जवानांना निशाणा बनवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, असा दावा जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (आयजी) विजय कुमार यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना विजय कुमार म्हणाले, "गेल्या आठवडाभरापासूनच माहिती मिळत होती, की जैश ए मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीन एकत्रितपणे, अशा प्रकारचा हल्ला करू शकतात. यानंतर आम्ही सातत्याने ट्रॅकिंग करत होतो. काल सायंकाळी पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफच्या मदतीने कारचा पाठलाग केला. आम्ही नाक्यावर वॉर्निंग फायरही केले. मात्र, दहशतवाद्यांनी गाडी थांबवली नाही."
विजय कुमार यांनी सांगितल्यानुसार, पुढील नाक्यावरही जवानांनी फायरिंग केली. मात्र, तेथे अंधार असल्याने, ते पळून गेले. यानंर आम्ही गाडी जप्त करून तिची तपासणी केली. यात मोठ्या प्रमाणावर IED सापडले. यानंतर आम्ही IED चेक केले आणि नंतर ते डिफ्यूज केले. दहशतवाद्यांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट आखला होता. मात्र, तो उधळून लावण्यात आला आहे.
युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज
विजय कुमार म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून या लोकांचा, असे काही करण्याचा कट होता. मात्र, त्यांना ते करता आले नाही. म्हणून ते आता प्रयत्न करत होते. मात्र आम्ही त्यांचा कट उधळून लावला. हे लोक पोलीस अथवा संरक्षण दलाला निशाणा बनवू शकत होते. या गाडीत जवळपास 40-45 किलो. स्फोटक होते.
#WATCH live: Security forces address media, in Srinagar of Jammu and Kashmir https://t.co/bb8rYoiAZN
— ANI (@ANI) May 28, 2020
सीमा वादातून नेपाळची माघार, भारताचा भूभाग नकाशात दाखविण्याचा प्रस्ताव घेतला मागे
जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएसह इतर संरक्षण दलाच्या जवानांनी ही कारवाई केली. संबंधित गाडी दक्षीण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रजपुरा रोडजवळ अडवण्यात आली. यानंतर बॉम्ब डिस्पोझल स्क्वॅयडला पाचारण करण्यात आले. यावेळी गाडीजवळील परिसर आणि घरे रिकामी करण्यात आली होती. आयईडी डिफ्यूज केल्यानंतर एक स्फोट झाला. यावेळी आकाशात जवळपास 50 मीटर उंच धुराचे लोळ उठले होते. यात केवळ गाडीचेच नुकसान झाले आहे.
POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता
गेल्या वर्षीही पुलवामामध्ये अशाच पद्धतीचा कट आखून दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात CRPF च्या जवळपास 45 जवानांना हौतात्म्य आले होते.