श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला; CRPFचे सहा जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 08:03 PM2019-10-26T20:03:49+5:302019-10-26T20:20:31+5:30
जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीर : श्रीनगरमधील करणनगर परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सहा सीआरपीएफचे जवान जखमी झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील करणनगर परिसरात सीआरपीएफ आणि पोलीस यांच्या संयुक्त पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. हा हल्ला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास झाला. यात सहा सीआरपीएफचे जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
जखमी झालेले जवान सीआरपीएफच्या 144व्या बटालियनमधील असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय, हा परिसरात सुरक्षा जवानांनी घेरला असून लपलेल्या दहशतवाद्याचा शोध सुरू आहे.
Jammu and Kashmir: 6 CRPF personnel injured in grenade attack by terrorists in Srinagar's Karan Nagar. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/z0uaozQIkn
— ANI (@ANI) October 26, 2019
CRPF: Unknown terrorists lobbed grenade upon Karan Nagar police station in Srinagar at 1850 hours today. 6 CRPF personnel of 144th battalion received injuries and evacuated to hospital. #JammuKashmirhttps://t.co/m1PaD5U5GF
— ANI (@ANI) October 26, 2019
दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तसेच, कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याची माहितीही जम्मू-काश्मीरपोलिसांनी दिली होती. या तीन दहशतवाद्यांची नावे नवीद ताक, हमीद लोन ऊर्फ हामिद लल्हारी आणि जुनैद भट अशी होती. तर हामिद लल्हारी हा अंसर-गजवात-उल-हिंद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होत्या.